esakal | घरकुल गैरव्यवहार : सुरेश जैन यांची हायकोर्टात याचिका
sakal

बोलून बातमी शोधा

Suresh-Jain

घरकुल योजनेत सुमारे 5000 घरांची बांधणी होणार होती. मात्र, अवघ्या 1500 घरांची बांधणी करण्यात आली.

घरकुल गैरव्यवहार : सुरेश जैन यांची हायकोर्टात याचिका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : जळगावमधील घरकुल योजनेच्या गैरव्यवहारामध्ये दोषी ठरलेले माजी मंत्री सुरेश जैन यांनी आता सत्र न्यायालयाच्या शिक्षेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपील याचिका केली आहे. जळगाव सत्र न्यायालयाने त्यांना सात वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

- पुणे : संगम पुलावरून महिलेने मारली उडी; शहरातील सलग दुसरी घटना (Video)

सुमारे 29 कोटी रुपयांचा गैरव्यवहार घरकुल योजनेत झाल्याचा आरोपामध्ये जिल्हा सत्र न्यायालयाने जैन यांच्यासह अन्य 47 जणांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. तसेच शिक्षा सुनावल्याच्या दिवशीच सर्व आरोपींना अटक करण्याचे निर्देश दिले होते. याचबरोबर तब्बल 100 कोटी रुपयांचा दंडही न्यायालयाने त्यांना सुनावला आहे. या निकालाविरोधात जैन यांनी नुकतेच उच्च न्यायालयात ऍड. सुभाष जाधव यांच्यामार्फत अपील याचिका केली आहे. अपीलावर सुनावणी होईपर्यंत शिक्षेला स्थगिती द्यावी, अशी मागणीही याचिकेत केली आहे.

- केंद्राला राज्य सरकारचा दणका; वाहन कायद्याला फाटा!

जैन यांच्यासह माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह नगरसेवक आणि अधिकाऱ्यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. घरकुल योजनेत सुमारे 5000 घरांची बांधणी होणार होती. मात्र, अवघ्या 1500 घरांची बांधणी करण्यात आली.

बांधकाम व्यावसायिक आणि अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करुन आरोपींनी संगनमताने यामध्ये गैरप्रकार केले असा ठपका फिर्यादीमध्ये करण्यात आला होता.

- आठवले म्हणतात, 'सत्ता हवीये तर माझ्याकडे या'

loading image
go to top