भाजपमधून एकदा सर्व ओबीसी आमदार बाहेर पडले की... : प्रकाश शेंडगे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 December 2019

भाजपमध्ये पंकजा मुंडे यांना डावलण्यात आले. ओबीसी नेत्यांना भाजपमध्ये त्रास देण्यात आला. भाजपमध्ये सर्वाधिक त्रास गोपीनाथ मुंडे यांना देण्यात आला. भाजपने नाशिकमध्ये बाळासाहेब सानप यांचे तिकीट कापले. भाजपमध्ये ओबीसी नेत्यांवर अन्याय सुरु आहे.

मुंबई : भाजपमधून एकदा सर्व ओबीसी आमदार बाहेर पडले की काहीही राहणार नाही. जनाधार असलेल्या नेत्यांचे भाजपकडून खच्चीकरण करण्यात आले. पक्षांतर्गत विरोधकांनी मोठा त्रास दिला. भाजपत पंकजा मुंडे यांनाही डावलण्यात आले, अशी जोरदार टीका माजी आमदार आणि धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

प्रकाश शेंडगे यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषद घेत भाजपमध्ये ओबीसी नेत्यांवर होत असलेल्या अन्यायाबद्दल वक्तव्ये केली. एकनाथ खडसे यांनीही भाजपमधील नेत्यांबद्दल नाराजी दर्शविली होती. आता पंकजा मुंडेही नाराज असल्याच्या चर्चा आहेत. 12 डिसेंबरला भगवान गडावर जाणार असल्याचे सांगत प्रकाश शेंडगे यांनी भाजपमधून ओबीसी नेत्यांनी बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. 

नाथाभाऊंची अवहेलना आम्हाला आवडली नाही : बाळासाहेब थोरात

शेंडगे म्हणाले, की भाजपमध्ये पंकजा मुंडे यांना डावलण्यात आले. ओबीसी नेत्यांना भाजपमध्ये त्रास देण्यात आला. भाजपमध्ये सर्वाधिक त्रास गोपीनाथ मुंडे यांना देण्यात आला. भाजपने नाशिकमध्ये बाळासाहेब सानप यांचे तिकीट कापले. भाजपमध्ये ओबीसी नेत्यांवर अन्याय सुरु आहे. एकदा हे सर्व आमदार पडले की काहीच राहणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ex MLA Prakash Shendge talked about OBC leaders in BJP