नाथाभाऊंची अवहेलना आम्हाला आवडली नाही : बाळासाहेब थोरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Balasaheb Thorat

नाथाभाऊंकडून आम्हाला प्रस्ताव नाही, आम्ही देखील काही प्रस्ताव दिला नाही. अशी माणसं पक्षात अली तर आनंद होईल, पक्षाला बळकटी मिळेल. पंकजा मुंडे चांगलं काम करत होत्या, तिची नाराजी मला माहित नाही.

नाथाभाऊंची अवहेलना आम्हाला आवडली नाही : बाळासाहेब थोरात

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे म्हणजेच नाथाभाऊ हे आमचे आवडते व्यक्तिमत्व आहे. त्यांची अवहेलना झाली, हे आम्हाला देखील आवडलं नाही, अशी खंत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

भाजपच्या नेत्यांबद्दल एकनाथ खडसे यांनी उघड नाराजी दर्शविली होती. सोमवारी ते आपले मत मांडण्यासाठी दिल्लीलाही गेले होते. आज ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. नाथाभाऊंना भाजपमध्ये डावलण्यात येत असल्याचे स्पष्ट असून, आता ते पुढे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याविषयी बाळासाहेब थोरात यांनी वक्तव्य केले आहे.

पायाभूत प्रकल्पांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही - उद्धव ठाकरे

थोरात म्हणाले, की नाथाभाऊंकडून आम्हाला प्रस्ताव नाही, आम्ही देखील काही प्रस्ताव दिला नाही. अशी माणसं पक्षात अली तर आनंद होईल, पक्षाला बळकटी मिळेल. पंकजा मुंडे चांगलं काम करत होत्या, तिची नाराजी मला माहित नाही. इतकी नाराजी योग्य नाही. खातेवाटपाविषयी विचाराल तर आम्ही गेले 13 दिवस काम करत आहोत, अभ्यास सुरू आहे. मुख्यमंत्री बैठका घेत आहेत. हे सरकार सकारात्मक काम करत आहे. 

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर