परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन? विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

राज्यातील महाविद्यालये आता प्रत्यक्ष सुरू होत असून, येणाऱ्या काळातील परीक्षा नक्की ऑनलाइन होणार की ऑफलाइन, या बद्दल विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
Student
StudentSakal

पुणे - राज्यातील महाविद्यालये आता प्रत्यक्ष सुरू होत असून, येणाऱ्या काळातील परीक्षा नक्की ऑनलाइन होणार की ऑफलाइन, या बद्दल विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. प्रामुख्याने हिवाळ्यात पार पडणाऱ्या परीक्षांबद्दल आत्ताच स्पष्टता करण्यात आली, तर अभ्यासाच्या दृष्टीने योग्य ती तयारी करता येईल, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली आहे.

कोरोनामुळे गेली दोन वर्षे सर्वच परीक्षा ऑनलाइन पद्धतीने पार पडल्या. परतू यातून विद्यार्थ्यांचे योग्य मूल्यमापन होऊ शकले नाही. आता पुन्हा एकदा महाविद्यालये खुली झाली असून, परीक्षेच्या पद्धतीबद्दल विद्यार्थ्यांमध्ये कुतुहल आणि संभ्रमाची अवस्था आहे. अभियांत्रिकीचा विद्यार्थी मयूर देशमुख म्हणता,‘‘महाविद्यालये आता ऑफलाइन सुरू झाली आहेत. आमच शिक्षण ऑनलाइन पद्धतीने झाले. त्यामुळे द्वितीय किंवा चतुर्थ सत्राच्या परीक्षा नक्की कशा होणार या बद्दल आम्हाला चिंता आहे. परीक्षेची पद्धत वेळीच लक्षात आली की आम्हाला त्या पद्धतीने तयारी करता येईल.’’ नैसर्गिक पद्धतीने परीक्षा या ऑफलाइन पद्धतीने व्हायला हवेत, तसा मूल्यमापन हा विषय पूर्णतः विद्यापीठाच्या अधिकारक्षेत्रातील गोष्ट असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

विद्यार्थ्यांचे म्हणणे...

- परीक्षा पद्धतीबद्दल वेळेवर कल्पना मिळावी

- अभ्यासक्रम आणि प्रश्नांच्या स्वरूपाबद्दल स्पष्टता असावी

- लेखी परीक्षेसाठी सराव चाचण्यांचे आयोजन करावे

- आजवर ऑनलाइन झालेल्या परीक्षा ऑनलाइनच व्हाव्यात

Student
CBSE दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दहा महत्त्वाच्या गोष्टी!

ऑनलाइन शिक्षणामुळे विषयांचा परिपूर्ण अभ्यासा होत नाही. परीक्षा पद्धतीबद्दलचा संभ्रम दूर झाला आणि मुल्यांकणाची रचना लक्षात आली. तर परीक्षेच्या दृष्टीने योग्य ती तयारी करता येईल.

- आदेश अस्वले, विद्यार्थी

ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतल्यामुळे मुल्यमापणाला मर्यादा येतात. त्यामुळे ऑफलाइन पद्धतीनेच विद्यार्थ्यांचे योग्यमुल्यमापण होऊ शकते. दोन वर्षांपासून प्रत्यक्ष लेखी परीक्षा नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या लिखाणावर परिणाम झाला आहे. त्यासाठी योग्य ती उपाययोजना महाविद्यालयांनी करावी.

- मंजूषा गोंगल, शिक्षणतज्ज्ञ

परीक्षा ऑफलाइन घ्याव्यात की ऑनलाइन याबद्दल परीक्षा मंडळ विद्यार्थ्यांच्या हिताचा योग्य तो निर्णय घेईल. महाविद्यालयेच ऑफलाइन सुरू झाल्याने

नक्कीच सर्वच परीक्षा ऑनलाइन होणार नाही.

- डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

आपलं मत काय..

परीक्षांचे मुल्यमापण कोणत्या पद्धतीने व्हायला हवे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी कोणती पद्धत योग्य, व्यक्त करा आपली मते खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर ८४८४९७३६०२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com