esakal | एकनाथ खडसेंना आली ED ची नोटीस ? यावर खडसेंची पहिली प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

एकनाथ खडसेंना आली ED ची नोटीस ? यावर खडसेंची पहिली प्रतिक्रिया

राज्यातील नेत्यांच्या मागे 'ईडी'ची कारवाई सूरूच असून आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांना 'ईडी'ची नोटीस आली असल्याचे बोलले जातेय.

एकनाथ खडसेंना आली ED ची नोटीस ? यावर खडसेंची पहिली प्रतिक्रिया

sakal_logo
By
विनोद राऊत

मुंबई, ता. 26 : राज्यातील नेत्यांच्या मागे 'ईडी'ची कारवाई सूरूच असून आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांना 'ईडी'ची नोटीस आली असल्याचे बोलले जातेय. एमआयडीसी भूखंड प्रकरण होणार खडसेंची चौकशी होणार असल्याचे कळतेय. 30 डिसेंबर ला चौकशीला उपस्थित राहण्याचे आदेश दिल्याचे वृत्त वेगाने पसरलं होते. 

महत्त्वाची बातमी : Fake TRP | टीआरपी गैरव्यवहार झाल्याचे "बीएआरसी'च्या अहवालातून स्पष्ट

दरम्यान, याबाबत स्वतः एकनाथ खडसे यांनी माहिती दिली आहे. तुर्तास माझ्यापर्यंत ईडीची कोणतीही नोटीस पोहचली नाही. मला जर नोटीस आली तर मी त्याला सामोर नक्की जाईन असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले असून या वृत्ताचा इन्कार केला आहे. यावर आज (ता. 26 ) जळगावला बोलणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा । Marathi news from mumbai

भाजपमध्ये अनेक नाराज आमदार असून ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. त्यांला प्रतिउत्तर देतांना 26 जानेवारीपर्यंत एक तरी आमदार फोडून दाखवा असे आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिलं होतं. यानंतर खडसे यांना ईडीची नोटीस आल्याचे  वृत्त आल्याने चर्चांना ऊत आला आहे. 

Exclusive Reaction of NCP leader eknath khadase on ED notice 

loading image