esakal | 'या' तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार; शिवसेनेचे १०, तर राष्ट्रवादीचे...
sakal

बोलून बातमी शोधा

Expansion of Maharashtra cabinet likely by December 24

महाविकासआघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार हा येणाऱ्या २४ डिसेंबर रोजी होणार असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात केवळ सहा मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर आता मंत्रिमंडविस्तार होणार आहे. पहिल्यांदा शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रत्येकी दोन मंत्र्यांनी शपथ घेतली होती.

'या' तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार; शिवसेनेचे १०, तर राष्ट्रवादीचे...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाविकासआघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार हा येणाऱ्या २४ डिसेंबर रोजी होणार असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात केवळ सहा मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर आता मंत्रिमंडविस्तार होणार आहे. पहिल्यांदा शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रत्येकी दोन मंत्र्यांनी शपथ घेतली होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 
दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचे १० मंत्री शपथ घेणार आहेत. यामध्ये ०७ कॅबिनेट तर ०३ जण राज्यमंत्री म्हणून शपथ घेतील. यासोबत राष्ट्रवादीचे ११ मंत्री शपथ घेणार आहेत. यामध्ये ०८ कॅबिनेट असतील तर तीन राज्यमंत्र्यांचा समावेश करण्यात येणार आहे. या मंत्रिमंडळात काँग्रेस पक्षालाही स्थान असून काँग्रेसचे ०८ मंत्री शपथ घेणार आहेत. यामध्ये ०६ कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश असेल तर दोनजण राज्यमंत्री म्हणून शपथ घेतील. महाविकासआघाडीचे असे एकूण २९ मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भाजपला मोठा झटका; महाराष्ट्रापाठोपाठ 'या' राज्यातही गमावणार सत्ता

दरम्यान, महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या पहिल्या शपथविधीला अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत, शिवसेनेच्या एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांनी शपथ घेतली होती. तर, राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा शपथविधी पार पडला होता. तर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि डॉ. नितीन राऊत यांनी शपथ घेतली होती.

loading image