esakal | भाजपला मोठा झटका; महाराष्ट्रापाठोपाठ 'या' राज्यातही गमावणार सत्ता
sakal

बोलून बातमी शोधा

Exit Polls Give Edge To Congress-JMM Alliance in Jharkhand Assembly Election

महाराष्ट्रापाठोपाठ आता झारखंडमध्येही भारतीय जनता पक्षाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपला झारखंडमध्ये सत्ता गमवावी लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ८१ विधानसभा मतदारसंघ असलेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीत पाच टप्प्यात मतदान घेण्यात आले होते.

भाजपला मोठा झटका; महाराष्ट्रापाठोपाठ 'या' राज्यातही गमावणार सत्ता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रांची : महाराष्ट्रापाठोपाठ आता झारखंडमध्येही भारतीय जनता पक्षाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपला झारखंडमध्ये सत्ता गमवावी लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ८१ विधानसभा मतदारसंघ असलेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीत पाच टप्प्यात मतदान घेण्यात आले होते.

CAA : उत्तरप्रदेशात आंदोलनाला हिंसक वळण; पाच ठार 

झारखंड विधानसभेसाठी पाच टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया झाल्यानंतर जाहीर झालेल्या कल चाचण्यांमध्ये कोणत्याच पक्षाला पूर्ण बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील भाजप सरकार पुनरागमन करण्याची शक्‍यता धूसर असून, कॉंग्रेस-झारखंड मुक्ती मोर्चा-राजद आघाडीला 41 ते 44 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

CAA : हा कायदा गरिबांच्या विरोधात; प्रियंका गाधी इंडिया गेटवर

झारखंडमधील विधानसभेच्या 81 जागांसाठी पाच टप्प्यांतील मतदानाचा आज अखेरचा टप्पा पार पडला. पाच वाजता मतदानाची वेळ संपताच तासाभरातच मतदानोत्तर कल चाचण्यांचे अंदाज जाहीर झाले. "आयएनएस-सी व्होटर'च्या अंदाजानुसार भाजपला 28 ते 36, तर झामुमो-कॉंग्रेस-राजद आघाडीला 31 ते 39 जागा मिळतील. उर्वरित छोट्या पक्षांना सहा ते सात जागा मिळतील. "इंडिया टुडे-ऍक्‍सिस-माय इंडिया'च्या अंदाजानुसार, कॉंग्रेसचा समावेश असलेल्या आघाडीला 38 ते 50 जागा मिळतील, तर भाजपला 22 ते 32 जागांपर्यंत समाधान मानावे लागेल. भाजपला 28, तर आघाडीला 44 जागा मिळण्याचा अंदाज "टाइम्स नाऊ'ने वर्तविला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बिहारचे विभाजन करून झारखंडची 2000 मध्ये निर्मिती झाल्यापासून भाजपचे नेते रघुबर दास हे मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले नेते ठरले आहेत. मात्र, कल चाचण्यांचा अंदाज पाहता त्यांची जागा झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन हे घेण्याची शक्‍यता आहे. 23 डिसेंबरला मतमोजणी असून, त्या दिवशीच सर्व पक्षांचे राज्यातील भवितव्य ठरेल.

2014च्या विधानसभा निवडणुकीतील पक्षीय बलाबल

 • इंडियन नेशनल कांग्रेस - 6
 • बहुजन समाज पार्टी - 1
 • भारतीय जनता पार्टी - 37
 • आजसु पार्टी - 5
 • झारखण्ड मुक्ति मोर्चा - 19
 • झारखण्ड विकास मोर्चा  - 8
 • कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया  - 1
 • जय भारत समानता पार्टी - 1
 • झारखण्ड पार्टी - 1
 • नवजवान संघर्ष मोर्चा - 1
 • मार्क्सिस्‍ट कोऑर्डिनेशन - 1
 • एकूण      -        81