मुंबई - राज्यातील सरकारी अनुदानित आणि राज्य शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमध्ये पहिलीपासून सीबीएसई पॅटर्नच्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू होत आहे, मात्र ही अंमलबजावणी करताना राज्यात बालभारतीची आतापर्यंत असलेली जी ओळख आहे ती ओळख कायम राहू द्या.
गरज पडल्यास बालभारतीमध्येच सीबीएसईचे स्वतंत्र मंडळ तयार करून ही अंमलबजावणी करावी, अशी स्पष्ट मते आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या शिक्षण कट्ट्यात विविध शिक्षण तज्ञांनी व्यक्त केली.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विकास मंच आयोजित शिक्षण कट्ट्यात आज सीबीएसई पॅटर्न आणि त्याच्या अंमलबजावणी संदर्भात खुल्या चर्चासत्राच्या आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये प्राचार्या भाग्यश्री पिसोळकर शिक्षण तज्ञ सचिन जोशी शिक्षण कट्ट्याचे समन्वयक माधव सूर्यवंशी मुख्याध्यापक महासंघाचे माजी अध्यक्ष व शिक्षण तज्ञ महेंद्र गणपुले यांच्यासह अनेक मान्यवर या कट्ट्याला यशवंतराव चव्हाण सेंटरचे कार्यक्रम संयोजक दत्ता बाळसराफ यांच्यासह राज्यभरातील शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रात आपले योगदान देणारे अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिक्षण विकास मंचचे समन्वयक डॉ. माधव सूर्यवंशी यांनी या शिक्षण कट्ट्याची पार्श्वभूमी आणि भूमिका मांडली.
या शिक्षण कट्ट्यामध्ये सीबीएसई पॅटर्न आणि त्याच्या अंमलबजावणी संदर्भात काही प्रश्नही उपस्थित करण्यात आले. मात्र या पॅटर्नची अंमलबजावणी करत असताना गणित, विज्ञान ही एनसीआरटीईची पुस्तके आहेत त्या स्थितीत घेत असताना त्यामध्ये राज्यातील काही भाग देखील जोडून घ्यावा, आणि तो अभ्यासक्रम विकसित करावा असे मते काही तज्ञांनी मांडली.
मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष महेंद्र गणपुले म्हणाले सीबीएससी पॅटर्न हा शब्द न वापरता वास्तव काय आहे हे समोर येणे आवश्यक आहे सीबीएसई समक्ष अभ्यासक्रम असे याला म्हणण्यास काही हरकत नाही.
असे मत व्यक्त करत स्पर्धात्मक युगामध्ये राज्यातील विद्यार्थ्यांनी विविध परीक्षांना सामोरे जाण्यासाठी हा अभ्यासक्रम अभ्यासला पाहिजे परंतु सीबीएसईच्या धर्तीवर राज्यातील शैक्षणिक वेळापत्रक चालेल का हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे. एप्रिल मे आणि जूनच्या 15 तारखेपर्यंत राज्यात विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम यात्रा जत्रा आणि विविध धार्मिक उत्सव असतात.
तर याच काळामध्ये शेतकरी देखील आपल्या शेतीचे कामे कमी असल्याने थोडा निवांत असतो अशा काळामध्ये हा समकक्ष अभ्यासक्रम लागू करताना त्याचा विचार होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी देशभरात सुरू असल्याने शिकवण्याच्या अनेक पद्धतीमध्ये बदल होत आहेत त्याची स्वागत केले पाहिजे. येत्या पाच वर्षात याच पार्श्वभूमीवर अनेक प्रकारचे बदल होतील आणि ते स्वागतार्ह असल्याचे मत शिक्षण तज्ञ सचिन जोशी यांनी व्यक्त केले.
प्राचार्य भाग्यश्री पिसोळकर म्हणाल्या, या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये विविध प्रकारच्या कौशल्य विषयक आणि व्यवसाय विषयक शिक्षणावर भर देण्यात आला आहे विविध प्रकारचे विषय त्यात आहेत परंतु त्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील बहुसंख्य शाळांमध्ये त्या प्रकारची व्यवस्था होणे शक्य वाटत नाही त्यामुळे क्लस्टरच्या माध्यमातून या संदर्भातील प्रयत्न केले जावेत असे मत त्यांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.