राज्यभरातील ज्येष्ठ नागरिकांना दिलासा; एसटीच्या स्मार्टकार्डसाठी मिळाली मुदतवाढ

प्रशांत कांबळे
Thursday, 13 August 2020

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर 23 मार्चपासून राज्यासह देशभरात लॉकडाऊन असल्याने महामंडळाने सुरुवातीला या योजनेला 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली होती.

मुंबई : एसटी महामंडळाच्या माध्यमातून राज्य सरकार विविध प्रकारच्या 29 सवलती योजना राबवत असतात. तर विविध सामाजिक घटकांना सुमारे 33 ते 100 टक्यांपर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत दिल्या जाते. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थीना आधार क्रमांकाशी निगडीत असलेल्या स्मार्ट कार्ड काढण्याची योजना एसटीने सुरू केली आहे. त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलतधारकांना स्मार्टकार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

जबरदस्त! धारावीत ऑगस्ट महिन्यात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू नाही

परंतु कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर 23 मार्चपासून राज्यासह देशभरात लॉकडाऊन असल्याने महामंडळाने सुरुवातीला या योजनेला 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली होती. एसटी महामंडळातील जेष्ठ नागरिकांच्या स्मार्टकार्ड योजनेला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली असून त्यामुळे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

वसई - विरारमध्येही गणरायाच्या आगमन आणि विसर्जनासाठी महापालिकेने ठरवली ही नियामावली; जाणून घ्या सविस्तर

कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव आणि बाधित संख्या बघता लॉकडाऊन काळात ज्येष्ठ नागरिकांना आगारात येऊन स्मार्टकार्ड घेणे शक्य नाही. त्यामुळे या योजनेला मुदतवाढ दिल्याने राज्यात स्मार्टकार्ड नोंदणी करण्यासाठी राहिलेल्या ज्येष्ठ नागरिक आणि एसटीच्या सवलत धारकांना मात्र याचा दिलासा मिळणार असून 1 डिसेंबरपासून ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवासासाठी स्मार्टकार्ड बंधनकारक राहणार असल्याचे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले आहे.
----
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Extension to st smart card for senior citizen given by msrtc