.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढील दोन वर्षांत महाराष्ट्राचे वीजदर हे गुजरात राज्यापेक्षाही कमी होतील आणि २०२९-३० पर्यंत महाराष्ट्र हे देशातील सर्वात कमी वीजदर असलेले राज्य बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. विधान परिषदेत राज्यातील वीजदर, स्मार्ट मीटर, ग्रीड सपोर्ट चार्जेस आणि खंडित वीजपुरवठ्याबाबत विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना फडणवीस यांनी आकडेवारीसह उत्तर दिले.