

महाराष्ट्रासह देशभरात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येतोय. मुंबईत मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी गणेशाची प्रतिष्ठापना केली. गणेशाच्या पूजेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी गणेशोत्सव जितका शक्य होईल तितका पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचं आवाहनही त्यांनी केली. तसंच कमीत कमी प्रदूषण होईल याची काळजी घेण्यासही सांगितलं. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी त्यांच्या आंदोलनाचा पुनर्विचार करावा असंही म्हटलं.