असा लाजिरवाणा विक्रम करणारे फडणवीस एकमेव मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 November 2019

देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर सर्वात कमी वेळात राजीनामा देण्याच्या लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. 
 

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात एकावर राजकीय भूकंप होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा दिला. यानंतर मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर सर्वात कमी वेळात राजीनामा देण्याच्या लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

देवेंद्र फडवीस हे महाराष्ट्रातील सर्वात कमी कार्यकाळ असणारे मुख्यमंत्री ठरले आहेत. देशात यापूर्वी कर्नाटकाचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा हे १७ मे २०१८ ते १९ मे २०१८ या फक्त दोन दिवसासाठी मुख्यमंत्री होते. त्यानंतर जगदंबिका पाल हे २१ फेब्रुवारी १९९८ ते २३ फेब्रुवारी १९९८ या फक्त तीन दिवसासाठी मुख्यमंत्री होते. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस २३ नोव्हेंबर २०१९ ते २६ नोव्हेंबर २०१९ या काळात केवळ तीन दिवस मुख्यमंत्री राहिले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या इतक्या कमी वेळात आजपर्यंत महाराष्ट्रात कुठल्याही मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला नव्हता.

अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

दरम्यान, यापूर्वी मारोतराव कन्नमवार हे महाराष्ट्राचे केवळ 9 दिवस मुख्यमंत्री होते. परंतु, ते काळजीवाहू मुख्यमंत्री होते. मारोतराव कन्नमवार यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस हे एकमेव मुख्यमंत्री आहेत. ज्यांनी केवळ 3 दिवसांत राजीनामा दिला आहे. त्यानंतर 258 दिवसांसाठी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला होता.

संजय राऊतांनी जाहीर केले मुख्यमंत्र्यांचे नाव

देवेंद्र फडणवीस हे आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे दुसरे मुख्यमंत्री आहेत. हाही विक्रम त्यांच्या नावावर असून एका महिन्याच्या कार्यकाळात दोनवेळा राजीनामा देण्याची वेळही त्यांच्यावर ओढावली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यापूर्वी महाराष्ट्रात केवळ माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनीच आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fadnavis is the only CM to make such a shameful record