संजय राऊतांनी जाहीर केले मुख्यमंत्र्यांचे नाव; अजित पवार आमच्यासोबत

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 November 2019

भाजपने मागील काही दिवस केलेला खेळ हा काळीमा फासणारा होता. महाराष्ट्राच्या जनतेला फसवणारा हा खेळ होता, आणि यामुळेच त्यांना महाराष्ट्राने परत पाठवले आहे.

मुंबई : 'पाच वर्षांसाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील, आम्हाला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची साथ आहे. उद्या (ता. 27) आम्ही महाबहुमत सिद्ध करू. त्यामुळे आता पाच वर्षांसाठी शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल,' असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. थोड्यावेळापूर्वीच सोफीटेल हॉटेलमध्ये महाविकासआघाडीची मोठी बैठक पार पडली. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

भाजपने मागील काही दिवस केलेला खेळ हा काळीमा फासणारा होता. महाराष्ट्राच्या जनतेला फसवणारा हा खेळ होता, आणि यामुळेच त्यांना महाराष्ट्राने परत पाठवले आहे. आमच्यासोबत अजित पवारांची चर्चा सुरू आहे. त्यामुळे उद्या आम्ही महाबहुमत सिद्ध करू, असेही राऊत यावेळी बोलले. फडणवीस मुख्यमंत्री असले काय नसले काय आम्हाला काही फरक पडत नाही, बाळासाहेबांचे स्वप्न आम्ही पूर्ण करू, असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला. 

काही वेळापूर्वी अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आता 3.30 वाजता फडणवीसांची पत्रकार परिषद होईल. फडणवीसही राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. 

अजितदादांच्या राजीनाम्या मागचे 'हे' आहे कारण 

आता संजय राऊत म्हणताहेत 'Wait and Watch!'
संजय राऊत यांनी आजच्या ट्विटमध्ये म्हणले आहे की, '162 and More... Just Wait And Watch!' याचाच अर्थ आमच्याकडे 162 पेक्षा जास्त आमदार आहेत... आता फक्त बघा! असा होतो. या ट्विटची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Raut says There will be no rotational CM for 5 years Uddhav Thackeray