कोरोनाचे प्रश्‍न फडणवीसांनी दोन दिवसांत सोडवले असते

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 July 2020

शरद पवार यांची चीनबद्दलची भूमिका ही मोदींच्या समर्थनार्थ होती. ती काँग्रेसला कशी पटेल, त्यांच्यामधील वादाचा फटका हा शिवसेनेला बसत आहे. पण सत्तेपायी त्यांना तो चालतोय.
- चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष

मुंबई - ‘राज्य सरकारने आमच्याकडे मदत मागितली असती तर देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना संदर्भातील प्रश्न दोन दिवसात सोडवले असते,’’ असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्य सरकारवर टीका करताना पाटील म्हणाले की, चौथीची पोरगी पण सांगेल की यांचे काही खरे नाही. कोरोना संकटात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जरी दिवसाचे दोन तास मागितले असते, तर त्यांनी कितीतरी प्रश्न सोडवले असते. पण ही मदत घ्यायला ‘इगो’ आडवा येतो.  सरकारला लॉक की अनलॉक अजून कळत नाहीत. आपसातले मतभेद आणि गोंधळ संपत नाहीत.

शरद पवार यांची चीनबद्दलची भूमिका ही मोदींच्या समर्थनार्थ होती. ती काँग्रेसला कशी पटेल, त्यांच्यामधील वादाचा फटका हा शिवसेनेला बसत आहे. पण सत्तेपायी त्यांना तो चालतोय.
- चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fadnavis would have solved Coronas question in two days chandrakant patil