
आमदाराचं बनावट लेटरहेड आणि सही वापरून ३ कोटींपेक्षा जास्त निधी बीड जिल्ह्यात वर्ग केल्याचा प्रकार समोर आलाय. अधिकाऱ्यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. या प्रकारामुळे आमदारांचा निधी योग्य ठिकाणीच जातोय का हे पाहण्यासाठी तपास यंत्रणा सरकारनं उभा करावी अशी मागणी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी विधानपरिषदेत केली. याआधी इतर काही आमदारांनाही असा अनुभव आला असल्याचंही ते म्हणाले.