Tuljabhavani Temple : बनावट ‘व्हीआयपीं’ना थेट दर्शन बंदी, तक्रारींनंतर तुळजाभवानी मंदिर प्रशासनाचा निर्णय
VIP Darshan Ban : तुळजाभवानी मंदिरात बनावट व्हीआयपी दर्शनप्रवेशावर भाविकांच्या तक्रारीनंतर थेट बंदी घालण्यात आली असून, मंदिर प्रशासनाने नवा नियम लागू केला आहे.
तुळजापूर : तुळजाभवानी मंदिरात आता बनावट ‘व्हीआयपीं’ना थेट दर्शनबंदीचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. ‘व्हीआयपी’ पास वाटपावरून अनेकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.