'शिवसेना भाजप एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही'; विक्रम गोखले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'शिवसेना भाजप एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही'; विक्रम गोखले
'शिवसेना भाजप एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही'; विक्रम गोखले

'शिवसेना भाजप एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही'; विक्रम गोखले

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे मराठी - हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठं नाव आहे. त्यांच्या प्रतिक्रियांची दखल ही वेगवेगळ्या स्तरांतून घेतली जाते. त्याला मोठा प्रतिसादही मिळताना दिसून येतो. त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं आहे. त्यांनी आघाडी सरकार ऐवजी भाजपनं पुन्हा शिवसेनेसोबत जावं. असं मत गोखले यांनी व्यक्त केलं आहे. एवढ्यावरचं ते थांबले नसून आपण ही युती व्हावी म्हणून प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे. त्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे ते म्हणाले.

सध्याच्या परिस्थितीवर आपले मत व्यक्त करताना गोखले यांनी प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री कंगनाच्या वक्तव्यावरही भाष्य केलं आहे. त्यांनी आपण त्या वक्तव्याचे समर्थन करत असल्याचे सांगताना देशाच्या इतिहासाबाबत काही दाखले दिले आहे. गोखले यांचे ते वक्तव्यही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्याला वेगवेगळ्या कमेंटही मिळत आहे. यावेळी त्यांनी अभिनेत्री कंगनाच्या वक्तव्याचे समर्थन करताना राजकीय परिस्थितीकडेही लक्ष वेधले आहे. आता गोखले यांचे ते वक्तव्य चर्चेत आले आहे. याशिवाय त्यांनी एस टी कर्मचाऱ्यांचा संप, त्यांचे आंदोलन यावरुन प्रशासनावर टीका केली आहे. गोखले म्हणाले, राजकीय वर्तुळात परिस्थिती गंभीर झालेली आहे, कोणाची नावं घेत नाही. ब्राह्मण समाजवरती टीकेची झोड उठवणे, मराठा आणि ब्रह्मणांमध्ये मतभेद निर्माण करणे काय चाललंय हे? कुणबी, क्षत्रिय हे सर्व माझे आहेत. दलितांना दलित म्हणणे मला पटत नाही.

मी कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील नाही नव्हतो आणि नसेन. शिवसेना आणि भाजप या पक्षांविषयी गोखले म्हणाले की, शिवसेना आणि भाजप एकत्र यायला हवे. ज्या कारणाने बाळासाहेब यांनी शिवसेना स्थापन केली त्या बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याचा प्रत्यय मला आहे. हे गणित चुकलेलं आहे हे सुधारायचा असेल तर भाजप आणि शिवसेना एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. मतपेट्यांचं राजकारण करणारे यांच्यामुळे हिंदू मुस्लिम, ब्राह्मण दलित यांत वाद होतील. शिवसेना भाजप पुन्हा एकत्र आले पाहिजे. याबाबत मी पुढाकार घेतलाय आणि घेईन. मी याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो तेव्हा चूक झाली असं उत्तर फडणवीसांनी दिलंय.

हेही वाचा: 'कंगना जे म्हणाली ते खरंय, मी समर्थन करतो'; विक्रम गोखले

हेही वाचा: 'जय भीम' IMDB च्या यादीत सर्वोच्च स्थानी; 9.6 रेटिंग

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाविषयी देखील गोखले यांनी टीका केली. ते म्हणाले, एसटी महामंडळाचा मी ब्रँड अँबेसिडर होतो. एअर इंडिया आण एसटीला गाळात घालण्याचे काम राजकीय लोकांनी केले.

loading image
go to top