'कंगना जे म्हणाली ते खरंय, मी समर्थन करतो'; विक्रम गोखले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'कंगना जे म्हणाली ते खरंय, मी समर्थन करतो'; विक्रम गोखले
'कंगना जे म्हणाली ते खरंय, मी समर्थन करतो'; विक्रम गोखले

'कंगना जे म्हणाली ते खरंय, मी समर्थन करतो'; विक्रम गोखले

sakal_logo
By
टीम इ सकाळ

मराठीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे आपल्या परखड वक्तव्यासाठी ओळखले जातात. ते जसे त्यांच्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत तसे ते ठाम भूमिका घेण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी एका कार्यक्रमातून सध्याच्या परिस्थितीवर आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी अभिनेत्री कंगनाच्या वक्तव्याचे समर्थन करताना राजकीय परिस्थितीकडेही लक्ष वेधले आहे. आता गोखले यांचे ते वक्तव्य चर्चेत आले आहे. याशिवाय त्यांनी एस टी कर्मचाऱ्यांचा संप, त्यांचे आंदोलन यावरुन प्रशासनाला धारेवर धरले आहे.

गोखले म्हणाले, राजकीय वर्तुळात परिस्थिती गंभीर झालेली आहे, कोणाची नावं घेत नाही. ब्राह्मण समाजवरती टीकेची झोड उठवणे, मराठा आणि ब्रह्मणांमध्ये मतभेद निर्माण करणे काय चाललंय हे? कुणबी, क्षत्रिय हे सर्व माझे आहेत. दलितांना दलित म्हणणे मला पटत नाही. देशाचा इतिहास बाबरापासून सुरु होतो तो आणि छापला जातो हे दुर्देव आहे. त्यापूर्वी कोणी नव्हते का?या देशाकरिता झटणारा हा माझा मुसलमान आहे, त्यात मी भेदाभेद करत नाही. माझ्या दृष्टीने बाबासाहेब या देशाला कळले नाही, आंबेडकर मोठे व्यक्तिमत्त्व होते त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही.आतापर्यंत देशातील सर्व पंतप्रधानांना शंभराच्या खाली मी गुण देतो त्यात लाल बहादूर शास्त्री सोडून. पण त्यांची जयंती ही 2 ऑक्टोबरला येते ती हेतुपुरस्सर पुसली जाते. त्याचा विसर पाडला जातो.

किती वर्षे कारस्थान आहे?

हा देश कधीही हिरवा होणार नाही हा देश भगवा राहिला पाहिजे. जे 70 वर्षात झालं नाही ते मोदींनी केलं, पक्षाचे काम सर्व करतात, पण ते देशासाठी मोदी चांगलं काम करतात. भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र आल्यास फार बरं होईल. मी कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील नाही नव्हतो आणि नसेन. शिवसेना आणि भाजप या पक्षांविषयी गोखले म्हणाले की, शिवसेना आणि भाजप एकत्र यायला हवे. ज्या कारणाने बाळासाहेब यांनी शिवसेना स्थापन केली त्या बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याचा प्रत्यय मला आहे. हे गणित चुकलेलं आहे हे सुधारायचा असेल तर भाजप आणि शिवसेना एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. मतपेट्यांचं राजकारण करणारे यांच्यामुळे हिंदू मुस्लिम, ब्राह्मण दलित यांत वाद होतील. शिवसेना भाजप पुन्हा एकत्र आले पाहिजे. याबाबत मी पुढाकार घेतलाय आणि घेईन. मी याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो तेव्हा चूक झाली असं उत्तर फडणवीसांनी दिलंय.

हेही वाचा: साताऱ्यात कंगना राणावत यांचा निषेध

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाविषयी देखील गोखले यांनी टीका केली. ते म्हणाले, एसटी महामंडळाचा मी ब्रँड अँबेसिडर होतो. एअर इंडिया आण एसटीला गाळात घालण्याचे काम राजकीय लोकांनी केले. कंगनाच्या वक्तव्यावर ते म्हणाले, कंगना जे म्हणाली ते खरंय, मी समर्थन करतो त्या वक्तव्याचे. आपले स्वातंत्रवीर जेव्हा फाशीवर जात होते तेव्हा फाशीपासून त्यांना वाचवलं नाही, हे चुकीचे आहे. ज्यांना फॉलोअर्स असतील त्यांनी शिवसेना आणि भाजप आघाडीबाबत पुढाकार घाययला हवा.

हेही वाचा: Movie Review; 'जय भीम' सणसणीत 'चपराक'

हेही वाचा: 'जय भीम' IMDB च्या यादीत सर्वोच्च स्थानी; 9.6 रेटिंग

loading image
go to top