
Kisan Pehchan Patra: देशभरातील शेतकऱ्यांना डिजिटल कृषी मिशन अंतर्गत डिजिटल ओळख देण्यासाठी केंद्र सरकारने "फार्मर आयडी कार्ड" तयार करण्याची योजना आखली आहे. याद्वारे 11 कोटी शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र देण्यात येणार आहे. या एकाच कार्डद्वारे शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी, किसान क्रेडिट कार्ड आणि पिकविक्रीसारख्या सुविधांचा लाभ घेता येईल.
कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने २८ नोव्हेंबर रोजी सर्व राज्यांना पत्र पाठवून शेतकरी ओळखपत्र तयार करण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. वित्तीय वर्ष 2024-25 मध्ये 6 कोटी, 2025-26 मध्ये 3 कोटी, तर 2026-27 मध्ये 2 कोटी शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात येईल.