‘फार्मर आयडी’ नसल्याने अडकली पूर, अतिवृष्टीची मदत! लाखो शेतकऱ्यांना अजूनही मिळाली नाही भरपाई, सोलापूर जिल्ह्यात आता जिल्हाधिकारी राबविणार विशेष मोहीम

ज्या शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅकच नाही आणि ॲग्रीस्टॅक आहे, परंतु पंचनाम्यातील नाव व ॲग्रीस्टॅकमधील नाव यामध्ये तफावत आहे, अशा शेतकऱ्यांची भरपाई प्रलंबित आहे. ॲग्रीस्टॅक नसलेल्या शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक देण्यासाठी विशेष कॅम्प सुरू केल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
शेतकऱ्यांना मिळेना भरपाई!

शेतकऱ्यांना मिळेना भरपाई!

Esakal
Updated on

सोलापूर : ज्या शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅक (फार्मर आयडी) आहे आणि ॲग्रीस्टॅकमधील नावाप्रमाणेच पंचनाम्यातीलही नाव आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टी, महापुराच्या भरपाईचे पैसे थेट बँक खात्यात जमा झाले आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅकच नाही आणि ॲग्रीस्टॅक आहे, परंतु पंचनाम्यातील नाव व ॲग्रीस्टॅकमधील नाव यामध्ये तफावत आहे, अशा शेतकऱ्यांची भरपाई प्रलंबित आहे. ॲग्रीस्टॅक नसलेल्या शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक देण्यासाठी विशेष कॅम्प सुरू केल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

भरपाईची रक्कम मिळण्यासाठी ई-केवायसीची अट रद्द केली आहे. परंतु ॲग्रीस्टॅक आवश्‍यक आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी ८६७ कोटी रुपयांची भरपाई मंजूर आहे. आतापर्यंत २७६ कोटींची भरपाई जमा केली आहे. आज रात्रीपर्यंत १६४ कोटींची भरपाई जमा होईल. एकूण ४४० कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होईल.

उर्वरित शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक मिळाल्यानंतर व नावातील दुरुस्ती झाल्यानंतर भरपाईची रक्कम मिळणार आहे. ॲग्रीस्टॅक नसल्याने जवळपास १२ टक्के शेतकऱ्यांना मदत मिळू शकली नाही. अँग्रीस्टॅक आहे परंतु नावात तफावत असल्याची प्रकरणे साधारणतः १ टक्के एवढी आहेत.

आकडे बोलतात....

  • मंजूर झालेली एकूण मदत : ८६७ कोटी ३७ लाख रुपये

  • बाधित शेतकरी संख्या : ७ लाख ६४ हजार १७३

  • बुधवारी रात्रीपर्यंत नावे अपलोड झालेल्या मदतीची रक्कम : ५७० कोटी रुपये

  • शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली रक्कम : २७६ कोटी (बुधवार, ता. २९ पर्यंत)

ॲग्रीस्टॅक म्हणजे काय?

ॲग्रीस्टॅक ही एक डिजिटल ओळखपत्र प्रणाली आहे. ज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक फार्मर आयडी मिळतो. या ओळखपत्राद्वारे शेतकरी विविध सरकारी योजना आणि अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात मिळवू शकतात, ज्यामुळे योजनांचा लाभ सुलभ होतो आणि पारदर्शकता वाढते. यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करणे आवश्यक आहे आणि ऑनलाइन पोर्टलद्वारे फार्मर आयडीसाठी अर्ज करता येतो.

...तर तात्काळ मिळेल मदत

सर्व तहसीलदारांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील किमान १० गावांमधील प्रत्येकी २५ शेतकऱ्यांशी चर्चा करावी. अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांना मिळाली की नाही मिळाली? याची माहिती संकलित करून पाठवावी. मदतवाटपाची आकडेवारी व प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मिळालेली मदत याची पडताळणी आम्ही करत आहोत. पंचनामा आणि ॲग्रीस्टॅकमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव एकच आहे, त्यांना तात्काळ मदत मिळालेली आहे.

- कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com