कर्ज फिटलं साहेब, लेकीच्या लग्नाला या; शेतकऱ्याचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र

farmer writes letter to cm uddhav thackeray dcm ajit pawar after loan waiver
farmer writes letter to cm uddhav thackeray dcm ajit pawar after loan waiver

मुंबई : "साहेब, कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार असल्यानं आता मुलीच्या लग्नाची चिंता नाही. तुम्हीही लग्नाला या,' असे आपुलकीचे आमंत्रण परभणी जिल्ह्यातल्या विठ्ठलराव गरुड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले. तर, पहिल्यांदाच कर्जमुक्तीसाठी हेलपाटे मारावे लागले नाहीत, अशी भावना नगर जिल्ह्यातल्या पोपट मुकटे या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांजवळ व्यक्त केली.

या दोन्ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीचे यश अधोरेखित करणाऱ्या ठरल्याची भावना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्‍त केली. कर्जमुक्त करण्यात आलेल्या १५ हजार ३५८ शेतकऱ्यांची यादी आज प्रसिद्ध करण्यात आली. महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्याचा शुभारंभ मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते आज विधानभवनात पार पडला. त्यानिमित्त परभणी, नगर आणि अमरावती जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या वेळी ६८ गावांतील सुरुवातीच्या १५ हजार पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली.

हेलपाटे मारावे लागले का? 
या योजनेचा लाभ घेताना काही त्रास झाला का? किती हेलपाटे मारावे लागले? किती कर्ज होते? कुठल्या पिकाला कर्ज घेतले होते? आधीच्या आणि आत्ताच्या कर्जमुक्ती योजनेमध्ये काय फरक जाणवला? असे प्रश्न मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लाभार्थ्यांना विचारले. त्यावर योजनेबाबत शंभर टक्के समाधानी असल्याची भावना नगर जिल्ह्यातील पोपट मुकटे यांनी व्यक्त करताना, "मागील वेळेस पाच ते सहा वेळा चकरा माराव्या लागल्या. मात्र, आत्ता केवळ एका थम्बवरच काम झालं,’ असे त्यांनी सांगितले. 

लेकीला लग्नाच्या शुभेच्छा 
परभणीच्या पिंगळी येथील विठ्ठलराव गरुड यांनी कर्जमुक्तीची रक्कम मिळणार असल्याने चिंता मिटल्याची भावना व्यक्त केली आणि मुलीचं लग्न जमलंय, अशी आनंदाची बातमी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलीला कुठं दिली? अशी आपुलकीची विचारपूस करतानाच लेकीला आणि जावयाला लग्नाच्या शुभेच्छाही दिल्या. हा संवाद ऐकताना हरखून गेलेल्या विठ्ठलराव यांनी लगोलग मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मुलीच्या लग्नाचे आमंत्रणही दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com