
हक्काचं पाणी मिळावं यासाठी राज्य पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याने आत्महत्या केली. कैलास नागरे असं तरुण शेतकऱ्याचं नाव असून त्याच्या बहिणीने केंद्रीय राज्यमंत्र्यांसमोर संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांना मारण्यासाठी तुम्हाला निवडून दिलंय का? शेतकरी आत्महत्या करतात तेव्हा आमदार-खासदार मंत्री कुठं असतात. शेतकरी पाण्यासाठी आत्महत्या करतोय तरी आपला देश कृषीप्रधान असल्याचं सांगत का मिरवता असा सवाल कैलास यांची बहीण सत्यभामा यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना विचारलं.