
Marathwada
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठं संकट आलं आहे. शेतातील मका, सोयाबीन, कापूस यांसारखी पिके उद्ध्वस्त झाली. शेतातील माती देखील वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. अशा परिस्थितीत काल सरकारने मदत जाहीर केली. मात्र ही आर्थिक मदत ही जून ते ऑगस्ट 2025 या कालावधीतील नुकसानीसाठी आहे, तर सप्टेंबरमधील नुकसानीसाठी पंचनामे बाकी असल्याने शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्याची शक्यता नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सप्टेंबरचे पंचनामे अजून बाकी असल्याचे सांगितले. यामुळे शेतकरी वर्गात असंतोष आणि चिंता वाढत आहे.