Bail Pola Festival : पोळ्याला सर्जा-राजाची टँकरच्या पाण्यातून अंघोळ; 2 हजार गावे-वाड्यांमध्ये टंचाईच्या झळा

Bail Pola 2023
Bail Pola 2023

Bail Pola Festival : निज श्रावणातील दर्श अमावास्येला गुरुवारी (ता. १४) राज्याच्या विविध भागांत बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा साजरा केला जाणार आहे. पण, नेमक्या या सणाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील ४२१ गावे आणि एक हजार ६४३ वाड्यांवर टंचाईने ग्रासले आहे.

प्रशासनातर्फे त्यावर उपाय म्हणून ४६८ टँकरद्वारे याठिकाणी पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे अशा भागात सर्जा-राजाला टँकरच्या पाण्यातून अंघोळ घालण्याची वेळ बळीराजावर आली आहे.

राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ३०.८ टक्क्यांनी कमी म्हणजेच ८५.६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. कोकणात सर्वाधिक १००.५ टक्के पाऊस झाला. (Farmers have to bathe bullocks with tanker water nashik news)

नाशिक विभागात ६४.३, पुणे विभागात ५८.४, छत्रपती संभाजीनगर विभागात ७८.१, अमरावती विभागात ८४.९, नागपूर विभागात ९४.२ टक्के पाऊस झाला आहे.

५० ते ७५ टक्क्यांपर्यंत पाऊस झालेल्या जिल्ह्यात नाशिकसह धुळे, नंदुरबार, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, अकोला, अमरावतीचा समावेश आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात ३८८ गावे आणि एक हजार ५६७ गावांना ४०६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र, पावसाच्या हुलकावणीमुळे एका आठवड्यात ६२ टँकर वाढवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

पुणे, नाशिक विभाग अधिक झळा

टंचाईच्या झळा पुणे आणि नाशिक विभागात मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. पुणे जिल्ह्यातील ३८ गावे- २७४ वाड्यांसाठी ४९, सातारामध्ये ८५ गावे- ३९८ वाड्यांसाठी ८९, सांगलीत ३१ गावे- २५१ वाड्यांसाठी ३७, सोलापूरमधील १४ गावे- १२१ वाड्यांसाठी १४ अशा एकूण १६८ गावे व एक हजार ४४ वाड्यांसाठी पुणे विभागात १८९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Bail Pola 2023
Bail Pola Festival 2023 : शेतकऱ्यांच्या बैलपोळ्याला महागाईचा चटका! साहित्याच्या दरात 20 टक्क्यांनी वाढ

नाशिक जिल्ह्यातील ९१ गावे- ११० वाड्यांसाठी ७८, धुळ्यातील एका गावासाठी १, जळगावमधील १५ गावांसाठी १७, नगरमधील ७६ गावे-४६४ वाड्यांसाठी ८१ अशा एकूण नाशिक विभागातील १८३ गावे व ५७४ वाड्यांसाठी १७७ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

इतर जिल्हानिहाय टंचाईग्रस्त गावे-वाड्यांची संख्या पुढीलप्रमाणे असून (कंसात जिल्ह्यातील टँकरची संख्या दर्शविते) : छत्रपती संभाजीनगर- ४२-८ (५९), जालना- २४-१७ (३९), बुलढाणा- ४-० (४). गेल्या वर्षी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात नगर जिल्ह्यातील तीन गावे आणि तीन वाड्यांसाठी एक टँकर धावत होता.

पोळ्याला सर्जा-राजाला विश्रांती दिली जाते. सर्जा-राजाला अंघोळ घालण्यात येईल. गुरुवारच्या (ता. १४) मिरवणुकीसाठी सर्जा-राजाची खांदा मळणी करीत त्याची शिंगे रंगवण्यात आली. बळीराजाने मिरवणुकीसाठी बाशिंग, माळा, नवी वेसण, नवा कासरा, तोडे खरेदी केले आहेत. महागाईच्या झळांमध्ये बळीराजाने घरखर्चात काटकसर करीत हा खर्च केला.

Bail Pola 2023
Bail Pola Festival: ज्याच्या दारी बैलजोडी, तोच खरा शेतकरी...! ‘ट्रॅक्टर’च्या युगातही सर्जा-राजाशी नाळ कायम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com