Maharashtra Government Decision : 'शेतीकामासाठी गाळ, माती बिनधास्त न्या', कसलीही रॉयल्टी भरायची नाही; बावनकुळेंचा शेतकऱ्यांना दिलासा

Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेती सुधारणा, विहीर, गोठा व शेतघर बांधकामासाठी लागणारा गाळ, माती आणि मुरूम नेण्यासाठी आता कोणतीही रॉयल्टी भरावी लागणार नसल्याची घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
Maharashtra Government Decision Farmers Soil Royalty Exemption

Maharashtra Government Decision Farmers Soil Royalty Exemption

esakal

Updated on

Maharashtra Farmers Soil Royalty Exemption : राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारा गाळ, माती आणि मुरूम काढताना यापुढे शासनाला कोणतीही रॉयल्टी (स्वामित्व धन) भरावी लागणार नाही. शेतीची सुधारणा, विहीर, गोठा, शेतघर बांधकाम तसेच शेतरस्त्यांच्या दुरुस्तीसाठी या गौण खनिजांचा वापर करण्यास शासनाने परवानगी दिली असून, यासंदर्भातील शासन निर्णयही तत्काळ जारी करण्यात आला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात ही घोषणा केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com