
shivaji maharaj
esakal
महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला. संपूर्ण मराठवाड्याची शेती नष्ट झाली आहे. ही परिस्थिती आता सर्वांना माहिती आहे. सर्व राजकीय नेते, सत्ताधारी-विरोधक, पाऊस ओसरल्यावर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत आहेत. मदतीचे आश्वासन देत आहेत. मात्र त्या तात्पुरत्या मदतीमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. अशा काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील कृषी धोरण पाहणे महत्त्वाचे आहे.