
पुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी यंदा वेगाने वाटचाल करत देशात लवकर आगमनाचा एक नवा विक्रम रचला. मे महिन्यात कोसळलेला पाऊस देखील उच्चांकी नोंद करण्याच्या मार्गावर आहे. मात्र प्रवाह मंदावल्याने त्याची पुढील चाल अडखळणार आहे. पुढील दोन आठवडे विशेषतः जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यासह देशात पाऊस दडी मारण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.