धक्कादायक! 'अंत्यसंस्कार करा नाहीतर मृतदेह फेकून द्या'; पित्याच्या मृत्यूनंतर निर्दयी मुलीचे वक्तव्य

पुण्यात बँक मॅनेजर म्हणून काम केलेल्या मूलचंद शर्मा यांच्या मृत्यूनंतर हा काळीज पिळवटून टाकणारा प्रकार घडला आहे.
Father and Daughter
Father and DaughterSakal

"अंत्यसंस्कार करायचे असले तर करा नाहीतर मृतदेह फेकून द्या पण आम्हाला उगीच त्रास देऊ नका, तुम्हाला आम्ही उपचार द्यायला सांगितले नव्हते." असं वक्तव्य आहे मृत पित्याच्या परदेशात शिकणाऱ्या आणि अलिशान आयुष्य जगणाऱ्या पोटच्या मुलीचे. हे वाचून तुम्हालाही धक्का बसला असेल पण पुण्यात काही वर्षे बँक मॅनेजर म्हणून काम केलेल्या मूलचंद शर्मा यांच्या मृत्यूनंतर हा काळीज पिळवटून टाकणारा प्रकार घडला आहे.

अधिक माहितीनुसार, मूळचे कर्नाटकातील निपाणी परिसरातील असणारे मृत मूलचंद शर्मा हे पुण्यात काही वर्षे बँक मॅनेजर म्हणून काम करत होते. त्यांचे दोन्ही मुले आता परदेशात उच्च पदावरील नोकरी करतात. मुलगा दक्षिण आफ्रिकेत तर मुलगी कॅनडात नोकरी करते. काही दिवसांपूर्वी शर्मा यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. पण यावेळीही त्यांचे मुले त्यांना भेटण्यासाठी आली नव्हती.

Father and Daughter
Talathi Exam : तलाठी परिक्षेला अवघ्या 60 सेकंदाच्या उशिरामुळे नाकारला प्रवेश! पुण्यातील प्रकार; विद्यार्थ्यांमध्ये संताप

नंतर त्यांची देखभाल एक कंत्राटी कामगार करत होता. त्यानंतर नागरमुनोळी येथील पांडुरंग कुंभार यांच्या रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. पण या कर्मचाऱ्याचे कंत्राट संपल्याने तो शर्मा यांना सोडून निघून गेला होता. ते ज्या लॉजवर होते त्या लॉज मालकाने यासंदर्भातील माहिती चिकोडी पोलिसांना दिली.

यानंतर पोलिसांनी शर्मांना ताब्यात घेत सरकारी रूग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचा एका आठवड्यापूर्वी मृत्यू झाला होता. यासंदर्भातील माहिती त्यांच्या मुलाला कळवावी यासाठी पोलिसांनी त्यांच्या दोन्ही मुलाला फोन लावण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, खूप प्रयत्न केल्यानंतर पोलिसांचा त्यांच्या मुलीशी संपर्क झाला. पण मुलीकडून साकारात्मक प्रतिसाद आला नाही. "तुम्हाला आम्ही माझ्या वडिलांना उपचार द्यायला सांगितले नव्हते. अंत्यसंस्कार करायचे असले तर करा नाहीतर मृतदेह फेकून द्या पण आम्हाला उगीच त्रास देऊ नका" असं वक्तव्य त्यांच्या मुलीने केले. मुलांनी कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे नागरमुनोळी येथील ग्रामपंचायतीने पोलिसांच्या मदतीने त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

Father and Daughter
Crime : 'तुझ्या नवऱ्याला जामिनावर सोडवतो...' असं म्हणत मध्यरात्री दीराचा भावजयीवर अत्याचार

आईवडील आणि मुलांच्या नात्याला काळीमा फासणारी आणि इतरांचे काळीज पिळवटून टाकणारी ही घटना आपल्याला नक्कीच विचार करायला लावणारी आहे. आपल्या मुलांनी चांगले शिकावे, त्यांनी आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण कराव्यात, आपल्या लेकराला यशाच्या उंच शिखरावर पाहण्याची प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते पण डोळ्यात तेल घालून वाढवलेल्या पोटच्या लेकरांकडून जन्मदात्याच्या उपकाराची अशा प्रकारे परतफेड होत असेल तर यापेक्षा दुर्दैव काय असेल?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com