
यवतमाळ: नुकताच युपीएससी नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला. यात महाराष्ट्रातल्या ९० पेक्षा जास्त जणांनी यश मिळवलंय. यवतमाळमधील मोहिनी खंदारे ही आयएएस झाली. पण तिच्या यशाचा आनंद साजरा करताना वडिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. आनंदोत्सव सुरू असतानाच वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं. प्रल्हाद खंदारे असं मोहिनीच्या वडिलांचं नाव आहे. ते पुसद पंचायत समितीचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी होते.