पोरीला कधी ओरडलो नाही, मग बाप म्हणून हे कस सहन करू? ; नताशाचे वडील जितेंद्र आव्हाड भावूक - Jitendra Awhad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jitendra Awhad

Jitendra Awhad : पोरीला कधी ओरडलो नाही, मग बाप म्हणून हे कस सहन करू? ; नताशाचे वडील जितेंद्र आव्हाड भावूक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला आणि जावयाला मारण्याची धमकी आली होती. याप्रकरणी धमकीची ऑडिओ क्लिअ सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. याप्रकरणी आव्हाड यांनी फेसबूक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

तिहार तुरुंगात जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना मारण्याचे आदेश गुंड सुभाष सिंह ठाकूर उर्फ ​​बाबाजीला दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश अहिर यांच्या नावाचा उल्लेख होता. सध्या महेश अहिर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यानंतर आव्हाड यांच्या संतप्त कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. दरम्यान आव्हाड यांनी भावनिक पोस्ट केली आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, "ज्या नताशाला मी तीच्या जन्मानंतर साधं बोटही कधी लावलं नाही किंवा ओरडलोही नाही. तीच्याबद्दल एक व्यक्ती फिल्डींग लावून मारुन टाकेन हे बोलतो. तेव्हा प्रचंड राग येतो. अस्वस्थता येते. तुम्हीच मला सांगा एक राजकीय नेता म्हणून हे सगळं सहन करायचं. एक पिता म्हणून हे सगळं सहन करायचं. आणि भूमिका काय घ्यायची ? घाबरुन घरी बसायचं, का उघडपणाने मैदानात यायचं

"कोण आहे बाबाजी ? बाबाजी म्हणजे दाऊद इब्राहीमचा हस्तक. जे-जे हत्या शुटआऊट मधील पहिल्या पाच जणांमधील एक आरोपी. स्वत:चं मुंबईमध्ये प्रचंड नाव असलेला. त्याच्या हस्तकांकरवी जावयाचा आणि मुलीचा मर्डर होणार. हे ऐकल्यानंतर एका बापाला काय वाटल असेल. राजकारण बाजूला ठेवा. पण, कधीतरी ह्या गोष्टीचा देखील विचार करा," असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

टॅग्स :jitendra awhad