गूगलने घेतली दखल, शासनाला मात्र विसर; फातिमा शेख जयंती विषयी उदासीनता | Fatima Shaikh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fatima Shaikh

गूगलने घेतली दखल, शासनाला मात्र विसर; फातिमा शेख जयंती विषयी उदासीनता

देऊळगाव राजा (जि. बुलडाणा) : स्त्री शिक्षणाची ज्योत तेवत ठेवण्याच्या सावित्रीबाई फुले (Savitribai Fule) यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या मुस्लिम समाजातील आद्य शिक्षिका यांच्या जयंतीनिमित्त गुगल ने फातिमा शेख (Fatima Shaikh) यांचे छायाचित्र असलेला लोगो ठेवून त्यांच्या कार्याचा गुणगौरव केला. मात्र त्यांची जयंती साजरी करण्याच्या दृष्टीने एकीकडे नागरिकांमध्ये अनभिज्ञता दिसून आली. तर फुले दांपत्याच्या खांद्याला खांदा लावून काम करणार्‍या फातिमा शेख यांच्या कार्याची राज्य शासनाने दखल घेतली नसल्याने प्रशासनामध्ये उदासीनता दिसून आली.

राष्ट्रीय महापुरुष,स्वातंत्र्यसैनिक व समाज जागृती करणाऱ्या अनेक महान व्यक्तींचे जयंती पुण्यतिथी साजरी करून त्यांना अभिवादन केले जाते या निमित्ताने त्यांनी केलेल्या समाज प्रबोधनात्मक कार्याला उजाळा दिला जातो यानिमित्त प्रशासकीय कार्यालय येथे महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यासंदर्भात निर्देश असतात त्या नुसार समाजप्रबोधक स्वातंत्र्य सेनानी व महापुरुषांना अभिवादनाचे औचित्याने त्यांच्या कार्याचे स्मरण केल्या जाते.

हेही वाचा: पंजाब नॅशनल बॅंकेत खाते आहे? जाणून घ्या PNB चे नवे नियम

समाज सुधारक सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीआई फुले यांनी उभारलेला स्त्री शिक्षणाच्या लढ्यात फातिमा शेख यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते ज्योतीबांनी मुलींच्या शिक्षणासाठी जी पहिली शाळा उभारली त्या शाळेसाठी फातिमा शेख यांच्या कुटुंबीयांनी जागा उपलब्ध करून दिली होती तर समाज परिवर्तनाच्या ह्या शैक्षणिक लढ्यात फुले दांपत्याच्या सोबत मुस्लिम समाजात शैक्षणिक जागृती करण्याचे कार्य फातिमा शेख या महिलेने केले होते.

मुस्लिम समाजातील पहिली महिला शिक्षक होण्याचा सन्मान फातिमा शेख यांच्या नावावर आहे शैक्षणिक दृष्ट्या समाजप्रबोधनाच्या या महत्त्वपूर्ण कार्यात ज्योतिबा व सावित्रीआई यांच्या कार्याला बळ देण्यासाठी आयुष्य भर साथ देणारी ही मावली एक प्रकारे दुर्दैवी ठरली आहे पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात फुले दांपत्याच्या सहकारी असलेल्या फातिमा शेख यांची जयंती व पुण्यतिथी अपेक्षेप्रमाणे साजरी होत नाही महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करण्या संदर्भात शासनाच्या यादीत फातिमा शेख यांचे नाव सामील करण्यात आले नाही.

याबरोबरच स्त्री शिक्षणाच्या लढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या या महान महिले विषयी समाजही अनभिज्ञ राहिले आहे शासकीय कार्यालयात त्यांची जयंती साजरी झाली नाही किमान त्यांचे शैक्षणिक कार्य बघून शाळा-महाविद्यालयात ही त्यांना अभिवादन करण्यात आली नसल्याने त्यांचे शैक्षणिक कार्य उपेक्षित राहिले आहे.

एकीकडे गुगल सारख्या लोकप्रिय संकेतावर फातिमा शेख यांचे छायाचित्र ठेवून गुगल ने जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले तर महाराष्ट्राच्या या मातेच्या जयंतीचा महाराष्ट्र शासन व प्रशासनाला विसर पडला शासनाने महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी निमित्त प्रशासकिय यादीत फातिमा शेख यांचे नाव समाविष्ट करून त्यांच्या कार्याचा सन्मान करावा अशी मागणी जोर धरत आहे

हेही वाचा: शाळा बंद...आता होणार ‘शिक्षण’ही बंद; निर्णयाचा शिक्षणतज्ञांकडून विरोध

शैक्षणिक दृष्ट्या मागासले पण असलेल्या मुस्लिम समाजात त्या काळात एका महिलेने शैक्षणिक जनजागृती केली विशेष म्हणजे सर्व जाती धर्मात मुलींच्या शिक्षणाला महत्व दिले जात नसताना अशा विपरीत परिस्थितीत स्त्री शिक्षणाच्या लढ्यात सहभागी होऊन मोलाचे कार्य फातिमा शेख यांनी केले आहे शासनाने त्यांच्या या कार्याची दखल घ्यावी व महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजरी करण्या च्या दृष्टीने प्रसिद्ध केलेल्या यादीत फातिमा यांचे नावही समाविष्ट करावे.

- लता राजपूत, आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त शिक्षिका

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top