

FDA's major decision regarding blood donation camps; Only blood centers can organize
Sakal
मुंबई : राज्यातील रक्तदान मोहिमेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि रक्त संकलनाचा दर्जा सुधारण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कडक नियमावली जारी केली आहे. नव्या नियमांनुसार, आता रक्तदान शिबिरांचे अधिकृत आयोजन केवळ आणि केवळ परवानाधारक रक्तपेढ्याच (Blood Centres) करू शकतील.