Pandharpur Wari: पंढरीच्या वारीसाठी ‘एफडीए’ची विशेष मोहीम, भाविकांच्या सेवेसाठी उचलले महत्त्वाचे पाऊल
FDA Action: आषाढी एकादशीनिमित्त सर्वाधिक मागणी मिठाई आणि प्रसादाला असते. यादरम्यान भेसळयुक्त पदार्थांची विक्री होऊ नये, यासाठी एफडीए प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.
मुंबई : येत्या ६ जुलैला असणाऱ्या आषाढी एकादशीनिमित्त अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. या दरम्यान सर्वाधिक मागणी ही मिठाई आणि प्रसादाला असते. ही मागणी पूर्ण करण्यासाठी अनेकदा दुकानदार भेसळ करतात.