Rain Update: शेतकऱ्यांची धाकधूक वाढली! येत्या 24 ते 48 तासात विजांच्या कडकडाटासह पावसांची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rain Update

Rain Update: शेतकऱ्यांची धाकधूक वाढली! येत्या 24 ते 48 तासात विजांच्या कडकडाटासह पावसांची शक्यता

Maharashtra: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन ‘मंदौस’ या चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. या वादळामुळे अवकाळी पाऊस पडू शकतो आणि शेतीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हवामान विभागाने उत्तर तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टीसाठी चक्रीवादळाचा इशारा दिला होता.

पण आता महाराष्ट्रालासुद्धा याची भीती असल्याचे मत व्यक्त होत आहे. हे वादळ 9 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत सुमारास 85 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह पुद्दुचेरी आणि श्रीहरिकोटा बेट ओलांडण्याची शक्यता सांगितली होती. या वादळाचा प्रभाव 10 डिसेंबरपर्यंत राहील असे ही म्हटले जात होतं. मात्र याचा परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Bhupendra Patel: दुसऱ्यांदा भूपेंद्र पटेलांच्या हाती गुजरातचं नेतृत्व; जाणून घ्या राजकीय प्रवास

महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्याता वर्तवण्यात आली आहे. पुढील 24 ते 48 तासात हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर हा पाऊस मघ्य महाराष्ट्र, कोकणात काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडणार आहे. तर कोकणाला या वाऱ्याचा सर्वाधीक फटका बसण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Maharashtra Newsrain