
सांगलीमधून एक घटना समोर आली आहे. सांगलीच्या रेठरेहरणाक्ष गावात एका पानपट्टीत खुलेआम देशी दारुची विक्री होत होती. सहजपणे उपलब्ध होणाऱ्या या दारुमुळे गावातील तरुणाई व्यसनाच्या आहारी गेली होती. त्यामुळे अनेक कुटुंबात कलह वाढला होता. महिला भगिनी त्यामुळे वैतागलेल्या होत्या. दलित वस्ती शेजारी ही पान पट्टी आहे.