esakal | जुलै महिन्यात पाचवी-आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा; परीक्षा परिषदेकडून तयारी सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

Exam

जुलै महिन्यात पाचवी-आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा; परीक्षा परिषदेकडून तयारी सुरू

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून जुलै महिन्यात पाचवी (Fifth) आणि आठवीची (Eight) शिष्यवृत्ती परीक्षा (Scholarship Exam) ही ऑफलाईन पद्धतीने (Offline Process) घेतली जाणार आहे. यासाठीची तयारी परिषदेकडून सुरू करण्यात आली असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. (Fifth and Eight Class Scholarship Exam in July)

एप्रिल-मे या महिन्यांमध्ये होणारी ही पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने परीक्षा परिषदेकडून या शिष्यवृत्ती परीक्षेचे नियोजन करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. जुलैमध्ये ही परीक्षा घेण्याचे नियोजन परिषदेकडून केले जात असून त्यासाठीची गोपनीय माहिती गोळा करण्याच्या सूचना राज्यातील सर्वच शिक्षण अधिकारी आणि संबंधित कार्यालयांना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: राज्यातील निर्बंध डिसेंबरपर्यंत राहणार! सप्टेंबरमध्ये तिसरी लाट?

तसेच घेण्यात येणाऱ्या परीक्षा केंद्र आणि त्याची माहितीही गोळा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.या शिष्यवृत्ती परीक्षेचे गोपनीय साहित्य जिल्हास्तरावर लवकरच पोचवले जाणार ते उतरवून घेण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी अथवा आपल्या कार्यालयात मध्यवर्ती व सुरक्षित ठिकाणाची निश्चिती करण्यात यावी. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी जबाबदारी सोपवण्यात आली असल्याची माहितीही सुपे यांनी दिली.

राज्यात 7 लाख विद्यार्थी देणार परीक्षा

राज्यात परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या पाचवी आणि आठवीतील शिष्यवृत्ती परीक्षेला सुमारे 7 लाखांहून अधिक विद्यार्थी बसणार आहेत. ही परीक्षा राज्यातील 350 हून अधिक परीक्षा केंद्रावर घेतली जाणार आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये सध्या कोरोनाची परिस्थिती आणि त्याचा स्तर कोणता आहे याचा आढावा सुद्धा घेतला जाणार आहे.

loading image
go to top