esakal | राज्यातील निर्बंध डिसेंबरपर्यंत राहणार! सप्टेंबरमध्ये तिसरी लाट?
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यातील निर्बंध डिसेंबरपर्यंत राहणार! सप्टेंबरमध्ये तिसरी लाट?

राज्यातील पहिल्या लाटेतील रूग्णसंख्या कमी झाल्यानंतर कोरोनाची दुसरी लाट येणार नाही, अशी अनेकांना खात्री झाली. मात्र, फेब्रुवारीनंतर दुसरी लाट आली आणि मृतांची संख्या एक लाखांवर तर बाधितांची संख्या ६० लाखांपर्यंत पोहचली.

राज्यातील निर्बंध डिसेंबरपर्यंत राहणार! सप्टेंबरमध्ये तिसरी लाट?

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील कोरोनाची Corona दुसरी लाट ओसरू लागली असून 30 शहरांमधील स्थिती सुधारत आहे. परंतु, कोरोना संपला म्हणून नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास कोरोनाची तिसरी लाट दोन महिन्यानंतर (सप्टेंबरमध्ये) येईल. तर नियमांचे पालन केले, गर्दी टाळण्यात यश आले तर डिसेंबरमध्ये तिसरी लाट येईल आणि ती सौम्य असेल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने Tatyarao Lahane यांनी दिली. राज्यातील पहिल्या लाटेतील रूग्णसंख्या कमी झाल्यानंतर कोरोनाची दुसरी लाट येणार नाही, अशी अनेकांना खात्री झाली. मात्र, फेब्रुवारीनंतर दुसरी लाट आली आणि मृतांची संख्या एक लाखांवर तर बाधितांची संख्या ६० लाखांपर्यंत पोहचली. ऑक्‍सिजन, रूग्णालयांमधील खाटादेखील अपुऱ्या पडल्या. त्यानंतर राज्य सरकारने Maharashtra Government ऑक्‍सिजन प्लॅण्टसह सरकारी रूग्णालयांमधील आरोग्य यंत्रणेवर तीन हजार कोटींचा खर्च करून सुविधा वाढविल्या. तरीही, तिसऱ्या लाटेची Corona's Third Wave भिती असल्याने मुंबई लोकल ट्रेन, धार्मिक स्थळे व ऑफलाइन शाळांवरील निर्बंध तूर्तास कायम ठेवले जाणार आहेत. कोरोनाचे निर्बंध शिथिलतेबाबत पाच टप्पे ठरवून दिले आहेत. त्यातील तीन टप्पे संपले असून आता उर्वरित दोन टप्प्यातील निर्बंध १० जुलैपर्यंत शिथिल होतील. मात्र, निर्बंध उठविल्यानंतरही रूग्णसंख्या वाढू लागली आणि रूग्णालयांमधील ऑक्‍सिजन बेड ४० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुंतल्यास पुन्हा त्याठिकाणी निर्बंध कडक करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना व महापालिका आयुक्‍तांना दिले आहेत. कोरोनाची तिसरी लाट किमान दोन महिन्यानंतर येऊ शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज असल्याने नागरिकांनी गर्दी करू नये, नियमांचे पालन करावे असे आवाहन केले जात आहे. Covid Restriction To Be Till December In Maharashtra, Third Wave In September

हेही वाचा: शिवसेनेत बाळासाहेबांचा एकच गट, पक्षात गटबाजी नाही- संजय राऊत

कोरोनाची तिसरी लाट येईल हे निश्‍चित आहे. दोन महिन्यानंतर ही लाट येण्याची शक्‍यता आहे. सप्टेंबरमध्ये ही लाट नाही आली, तर डिसेंबरमध्ये येऊ शकते. मात्र, नागरिकांनी स्वत:बरोबरच कुटुंबाच्या आरोग्याची खबरदारी घेऊन नियमांचे पालन केल्यास ही लाट सौम्य असेल.

- डॉ.तात्याराव लहाने, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई

हेही वाचा: वैजापूर तालुक्यात पिसाळलेल्या वानराचा धुमाकूळ, अनेक जण जखमी

निर्बंध शिथिलतेबाबत आपत्ती व्यवस्थापनाचे म्हणणे...

- मंदिरे, धार्मिक स्थळांमध्ये दर्शनासाठी होऊ शकते मोठी गर्दी

- मुंबई लोकल ट्रेनमध्ये Mumbai Local Train असतात प्रवासी क्षमतेच्या चौपट लोक

- ऑफलाइन शाळा सुरू करण्याचा विचार तुर्तास नाहीच. तिसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन निर्णय

- निर्बंध शिथिल केल्यानंतर रूग्ण वाढत असल्यास तत्काळ निर्बंध कडक करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार

- पॉझिटिव्हीटी रेट व मृत्यूदर ०.५०टक्‍क्‍यांपेक्षा कमी होत नाही, तोवर निर्बंध (डिसेंबरपर्यंत) राहणारच

loading image
go to top