esakal | Breaking : पाचवी-आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली
sakal

बोलून बातमी शोधा

Scholarship

कोरोनाचे संकट घोंघावत असताना या परीक्षा मे महिन्यात घेण्याला शिक्षक संघटनांकडून विरोध दर्शविला जात होता.

Breaking : पाचवी-आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली

sakal_logo
By
मीनाक्षी गुरव

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी इयत्ता पाचवी आणि आठवीची २३ मे रोजी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा (Scholarship exam) पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोनाचा (Corona) वाढता प्रादुर्भाव पाहता ही शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली असल्याची माहिती परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली आहे. परीक्षेच्या तारखा यथावकाश तारखा कळविण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे. शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलल्याचे अधिकृत परिपत्रक सोमवारी (ता.१०) काढण्यात येईल, असे वृत्त 'सकाळ'ने दोन दिवसापूर्वी प्रसिद्ध केले होते. त्याप्रमाणे परीक्षा परिषदेने परीक्षा पुढे ढकलल्याचा अधिकृत निर्णय आज जाहीर केला. (Fifth and Eighth std scholarship exams postponed due to Corona)

हेही वाचा: शरद पवारांचे कट्टर विरोधक संभाजीराव काकडे यांचे निधन

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यात, तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. अशात इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा मात्र २३ मे रोजी होणार की नाही, याबाबत प्रश्न उपस्थित होत होते. दरम्यान कोरोनाचे संकट घोंघावत असताना या परीक्षा मे महिन्यात घेण्याला शिक्षक संघटनांकडून विरोध दर्शविला जात होता. शिष्यवृत्ती परीक्षेला स्थगिती द्यावी, परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी शिक्षक संघटनांकडून होत होती.

हेही वाचा: नितीन गडकरी यांनी फडणवीसांचे कान टोचण्यासह केली हात जोडून विनंती

दरवर्षी फेब्रुवारीत होणारी शिष्यवृत्ती परीक्षा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिलमध्ये घेण्यात येणार होती. मात्र, ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून २३ मे रोजी ही परीक्षा घेण्याचा निर्णय ३० मार्चला घेण्यात आला. दरम्यान परीक्षा परीषदेकडून परीक्षा आयोजनाची पूर्ण तयारी करण्यात येत होती. झाली आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती प्रतिकूल असेल, तर परीक्षा रद्द करण्याएवजी काही काळासाठी पुढे ढकलणे उचित ठरेल, अशा मागणीचा प्रस्ताव सुपे यांनी शालेय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिवांकडे पाठविला होता. आता परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

- शिष्यवृत्ती परीक्षेतून पाचवीच्या १६ हजार ६९३ विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत, तर आठवीच्या १६ हजार ५८८ विद्यार्थ्यांना दहावीपर्यंत दर महिन्याला शिष्यवृत्ती देण्यात येते.

- राज्यातून सहा लाख तीस हजार विद्यार्थ्यांनी केली नोंदणी

राज्यभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.