Kukadi Canal: अखेर नगरकरांना पाणी मिळालं; कुकडी डावा कालव्यातून आवर्तन सुरू

Kukadi Canal
Kukadi Canalesakal

नारायणगाव : उन्हाळी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी व बिगर सिंचनासाठी कुकडी प्रकल्पाअंतर्गत येडगाव धरणातून कुकडी डावा कालव्यात पाणी सोडण्यात सुरवात केली आहे. तीस दिवसांच्या आवर्तनात कुकडी डावा कालव्यात कालव्यात ३.६३ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. या पाण्याचा लाभ ‘टेल टू हेड’ या पद्धतीने करमाळा, कर्जत, श्रीगोंदा, पारनेर, जुन्नर या तालुक्यांना होणार आहे.

कुकडी प्रकल्पातील धरणात शुक्रवारअखेर ४.९३४ टीएमसी (१६.६३ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. गत वर्षी आजअखेर प्रकल्पात २.७८० टीएमसी (९.३७ टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता. या आवर्तनाद्वारे नियोजित सिंचनाच्या पाणी वाटपाचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्र.१ चे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर यांनी दिली.

Kukadi Canal
Jejuri: जेजुरीत देवस्थानच्या विश्वस्तपदाचा वाद चिघळला; ग्रामस्थ ठोठावणार उच्च न्यायालयाचे दार

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ९ मे रोजी पुणे येथे कालवा सल्लागार समितीची बैठक झाली होती. त्यात जुन्नर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या तालुक्यासाठी २२ मेपासून आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मात्र, आमदार अतुल बेनके, भाजप नेत्या आशा बुचके यांच्यासह सर्व पक्षीय नेते व शेतकरी संघटनेने या आवर्तनाला विरोध केला होता. माणिकडोह धरणात पिण्यासाठी पुरेसा पाणीसाठा शिल्लक ठेवून व पिंपळगाव जोगे धरणातील मृतसाठ्यातील ३ टीएमसीऐवजी दोन टीएमसी व डिंभे धरणातील एक टीएमसी पाण्याचा वापर करून हे आवर्तन पूर्ण करण्याचे फेरनियोजन करून २५ मे रोजी सायंकाळी सात वाजता येडगाव धरणातून डावा कालव्यात ५०० क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरवात केली.

शुक्रवारी सकाळपासून वाढ करून १४०० क्यूसेकने पाणी सोडण्यात आले. धरणनिहाय शिल्लक उपयुक्त पाणीसाठा टीएमसीत व कंसात टक्केवारी : येडगाव : १.२२८ (६३.१८), माणिकडोह : ०.६५३ (६.४२), वडज : ०.१७९ (१५.३१), डिंभे :२.०३८ (१६.३२), पिंपळगाव जोगे : ०.८३४ (२१.४४).

Kukadi Canal
Crime News: घरचे निवडणुकीच्या प्रचाराला गेले होते, ६० वर्षीय म्हाताऱ्याचा मतिमंद मुलीवर अत्याचार

एक ‘टीएमसी’चा होणार अपव्यय

पाच तालुक्यांना जोडणारा कुकडी डावा कालवा प्रकल्पातील सर्वाधिक २४९ किलोमीटर लांबीचा आहे. करमाळा तालुक्यात पाणी पोचण्यासाठी सात दिवसाचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर शिल्लक २३ दिवसांपैकी करमाळा तालुक्यासाठी सात दिवस, कर्जत तालुक्यासाठी आठ दिवस, श्रीगोंदा तालुक्यासाठी सहा दिवस, पारनेर व जुन्नर तालुक्यासाठी दोन दिवस आवर्तन नियोजन केले आहे.

कालव्याची झालेली दुरवस्था, बाष्पीभवन, गळती, वहनव्यय यामुळे एक टीएमसी पाण्याचा अपव्यय होणार असून, ३.६३ टीएमसीपैकी २.६३ टीएमसी पाण्याचा वापर प्रत्यक्षात सिंचनासाठी होणार आहे. पाणी सोडण्यासाठी आग्रह धरणारे लोकप्रतिनिधी कालवा दुरुस्तीला निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा का करत नाहीत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महिन्यात ०.७१० टीएमसी बाष्पीभवन

या वर्षी ४१ अंशांपर्यंत उच्चांकी तापमान असल्याने बाष्पीभवन वेग वाढला आहे. मागील तीस दिवसांत येडगाव, माणिकडोह, वडज, डिंभे, पिंपळगाव जोगे या धरणातील ०.७१० टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. सर्वाधिक पिंपळगाव जोगे धरणातील ०.२४० टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com