Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या नावाने मंत्रालयात बोगस भरती; रॅकेट उघड झाल्याने खळबळ


dhananjay munde bogus clerk recruitment scam in mantralaya case filled aginst 3 one arrested latest news
dhananjay munde bogus clerk recruitment scam in mantralaya case filled aginst 3 one arrested latest news

bogus clerk recruitment scam : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाने मंत्रालयात बोगस भरती झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. थेट मंत्रालयातून या बनावट भरतीचे रॅकेट चालवले जात असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रालयातील कर्मचारीच हे बनावट लिपिक भरतीचे रॅकेट चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे.

बोगस रॅकेट चालवल्याप्रकरणी गोवंडी पोलिस स्थानकात मंत्रालयातील एका कर्मचाऱ्यासह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालिकेतून सेवा निवृत्त झालेल्या यशवंत कदम यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला. या घोटाळ्यात गोवंडीमधील एका तरुणाची सात लाखांहून अधिक रुपायाची फसवणूक झाली होती. 

या बोगस लिपिक भरती प्रकरणी माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाचा वापर करत नियुक्ती आदेशाचे बनावट पत्र देण्यात आले होते. याप्रकरणी निखिल माळवे, शुभम मोहिते आणि नीलेश कुडतरकरविरोधात गुन्हा नोंदवत माळवेला अटक करण्यात आली आहे.


dhananjay munde bogus clerk recruitment scam in mantralaya case filled aginst 3 one arrested latest news
Warishe Murder Case : अपघात नव्हे, वारीशेंवरील हल्ला पूर्वनियोजित; आरोपीने दिली कबुली

धनंजय मुंडे काय म्हणाले?

साम टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, 'या प्रकरणातील शुभम मोहिते नावाच्या व्यक्तीला मी ओळखत नाही. या नावाची कुठलीही व्यक्ती कार्यरत नव्हती. नोकरीसाठी देण्यात आलेले आदेशपत्रही बनावट आहे. असे आदेशपत्र देण्यात येत नाही.

या आदेशपत्रात बनावट सही-शिक्याचा वापर करण्यात आला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. पोलीस अधिकाऱ्याशी भेट घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणार आहे' अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

दरम्यान या बोगस भरती प्रकरणात मंत्रलयातील आणखी नावे पुढे येतात का? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.


dhananjay munde bogus clerk recruitment scam in mantralaya case filled aginst 3 one arrested latest news
leopard In Chakan : पुण्यातील चाकणमध्ये शिरला बिबट्या! वन विभाग, अग्निशमन दल दाखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com