Rahul Shewale
Rahul Shewaleesakal

Rahul Shewale : " साधी FIR घेतली जात नाही", MP शेवाळेवर लैंगिक आरोप करणाऱ्या महिलेच्या पाठीशी अंधारे

Published on

मुंबई - शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्यावर पोलिस गुन्हा दाखल करत नसल्याने पीडित महिलेने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं होते शेवाळे यांनी आपल्यावर बलात्कार करत, मानसिक त्रास दिल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केला होता. मात्र मागील दहा महिन्यांपासून तक्रार दाखल झाली नव्हती. अखेर तरुणीने न्यायालयात धाव घेत तक्रार दाखल केली. याबाबत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट केलं आहे.

Rahul Shewale
Uddhav Thackeray : ...त्यामुळे ठाकरे पंतप्रधानपदासाठी सक्षम नाहीत; केंद्रीय मंत्र्यांचं विधान

मागील दहा महिन्यांपासून पीडित तरुणी केवळ तक्रार दाखल करण्यासाठी लढा देत होती. मात्र तिची कुठेही तक्रार घेतली गेली नाही. अखेर तिने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात आता राहुल शेवाळे यांच्याविरुद्ध १५६ (३) अंतर्गत तक्रार दाखल करून घेतली आहे.

याबाबत तरुणीने एक व्हिडीओ ट्विट केलं आहे. ज्यात तिने म्हटलं की, मी अनेक दिवस लढा दिला. महाराष्ट्रात कुठंही तक्रार दाखल करून घेतली नाही. त्यामुळे अखेर मी एमएम कोर्ट अंधेरी येथील तक्रार दाखल केली. रुपाली पाटील ठोंबरे यांनी मला मदत केली. त्यांचे आभार. मला तक्रार दाखल करता येऊ नये यासाठी महाराष्ट्रातील सर्व कायदे बदलले गेले, असं पीडितेने म्हटलं आहे.

Rahul Shewale
Uddhav Thackeray Astrology : उद्धव ठाकरेंच्या राशीतील शनि अशुभ, ग्रहयोग ठिक नसल्याने यंदाची होळी...

सरकारला मला हेच सांगायचं की, महाराष्ट्रात मुली सुरक्षित नाही. राहुल शेवाळेसारखे लोक जोपर्यंत असतील तोपर्यंत मुली सुरक्षित राहूच शकत नाही, असंही पीडितेने म्हटलं आहे. पीडित तरुणीचं ट्विट ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रिट्विट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com