मृत शेतकऱ्यांप्रती शोक व्यक्त करताना आतषबाजी, राहुल गांधी संतापले; म्हणाले...: Bharat Jodo Yatra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi_Bharat Jodo Yatra

Bharat Jodo Yatra: मृत शेतकऱ्यांप्रती शोक व्यक्त करताना आतषबाजी, राहुल गांधी संतापले; म्हणाले...

शेवागवमध्ये भारत जोडो यात्रे दरम्यान राहुल गांधींची नुकतीच सभा पार पडली. यावेळी शेतकरी आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र, याचवेळी कोणीतरी सभेच्या ठिकाणी फटाके वाजले होते, या प्रकरामुळं राहुल गांधी चांगलेच भडकले होते. (Firecrackers burst during Farmer condolence meeting at Rahul Gandhi rally in Shegav)

हेही वाचा: महाराष्ट्रातून 'हे' पार्सल परत पाठवायची वेळ आली; मनसे राज्यपालांविरोधात आक्रमक

या सभेवेळी एकीकडे काँग्रेसचे नेते शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करत होते तर दुसरीकडे आकाशात फटाक्यांची आतषबाजी सुरु होती. यावर राहुल गांधी चांगलेच संपातले आणि त्यांनी फटाके फोडण्यापासून रोखण्याची विनंती आयोजकांना केली. पुढे भाषणासाठी पुढे आल्यानंतर ते म्हणाले, आपण आज ७३५ शहीदांची आठवण काढत होतो. हा भारतातील प्रत्येक शेतकऱ्याचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा यांनी आपमान केला आहे.

हेही वाचाः महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

भाजपची टीका

या प्रकारावरुन भाजप नेते आकाश फुंडकर यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. ते म्हणाले, "त्यांनी शेतकऱ्यांना श्रद्धांजली देण्यासाठी सभेचं आयोजन केलं होतं. तिथं त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला, त्यांना लाज वाटायला पाहिजे होती. तिथं केवळ काँग्रेसचे लोक होते. या व्यासपीठावर शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सावकाराला उभं करत असाल तर जनता तुम्हाला घरी बसवल्याशिवया राहणार नाही"