Lumpi Disease : सत्काराच्या फेट्याने बांधल्या जनावरांच्या जखमा; देशातलं पहिलं क्वारंटाईन सेंटर

२३ वर्षांच्या तरुणाने हे क्वारंटाईन सेंटर सुरू केलं असून तो याच्या माध्यमातून लंपीबाधित जनावरांची सेवा करत आहे.
Lumpi Disease
Lumpi DiseaseSakal

लंपी आजाराने सध्या राज्यातलं गोधन त्रस्त आहे. लंपीच्या प्रादुर्भावाने हजारो जनावरांनी आपले प्राण गमावले आहेत. अशा लंपीबाधित जनावरांसाठी अहमदनगरमधला एक तरुण प्रयत्नशील आहे आणि त्याने देशातलं पहिलं क्वारंटाईन सेंटर उभारलं आहे.

या तरुणाचं नाव शरद मरकड असं आहे. तो २३ वर्षांचा असून पदवीधर आहे. त्याने हे क्वारंटाईन सेंटर सुरू केलं आहे. आज लंपी रोगामुळे देशभरात लाखो गाई आजारी आहेत. अशा परिस्थितीत शरदचं हे पाऊल काही गाईंना तरी दिलासा देणारं ठरत आहे. लंपीमुळे निर्माण झालेली ही परिस्थिती मला पाहवत नव्हती. मी एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. शासन यावर काही उपाययोजना करत नाही.अशा या परिस्थितीत मी देशातील पहिलं, लोकसहभागातून लम्पी क्वारंटाईनसेंटर सुरू केलंय, असं शरद सांगतो.

शरद मरकड
शरद मरकडSakal
Lumpi Disease
Lumpy Skin Disease संपलाय का? विदर्भात पशुधनाची काय स्थिती आहे?

हा तरुण लंपीबाधित जनावरांवर उपचार करत आहे. अशातच गावकऱ्यांनी सन्मान म्हणून दिलेला फेटा जनावरांच्या उपचाराच्या कामी आला, असा एक अनुभवही त्याने सांगितला आहे. आजतागायत या रोगाने पूर्ण देशभरात जवळपास ५७००० हून अधिक जनावरांचा मृत्यू झालेला आहे पूर्ण देशभरात पंधरा लाखांहून अधिक गाईंना या लम्पी रोगाची लागण झालेली आहे. शिवाय हा आजार तीव्र संसर्गजन्य असून एका राज्यातून दुसऱ्या राज्यात तीव्र वेगाने पसरत आहे.

महाराष्ट्रात देखील हा आजार मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. हा रोग डास चावल्यामुळे होतो. या आजाराच्या लक्षणांमध्ये प्रथम जनावरांना ताप येतो त्यांचे वजन कमी होते. जनावरांच्या डोळ्यात चिकट पाणी येते. तोंडातून लाळ गळते. शरीरावर छोट्या गाठी यायला लागतात या व्हायरसची लागण झालेल्या जनावरांचा योग्य आणि पुरेशा उपचाराअभवी मृत्यू होऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com