- ऋषिकेश गोळेयवतमाळ : केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये आदिबा अहमद हिने १४२ वा क्रमांक मिळवून राज्यात पहिली मुस्लिम महिला बनण्याचा मान पटकावला आहे. आदिबा हिने मिळवलेल्या यशाचे श्रेय तिच्या कुटुंबाला आणि मामाला जाते, असे तिने सांगितले. .देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत यशस्वी होण्याची इच्छा असते. परंतु ती प्रत्यक्षात आणण्यात फार कमी विद्यार्थ्यांना यश मिळते. यंदाच्या वर्षी यवतमाळ जिल्ह्याच्या आदिबा अहमद हिने ही कठीण परीक्षा उत्तीर्ण केली असली, तरी ती राज्यातील पहिली मुस्लिम महिला आयएएस (IAS) अधिकारी बनली आहे. आदिबाने देशात १४२ वा क्रमांक मिळवून यवतमाळ जिल्ह्याची आणि राज्याची मान उंचावलेली आहे. यामुळे आदिबाच्या कुटुंबात आणि मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण आहे..यूपीएससीचा अंतिम निकाल २२ एप्रिल २०२५ रोजी जाहीर झाला. त्यामध्ये महिला उमेदवारांनी पुन्हा एकदा त्यांची मेहनत आणि संघर्ष सिद्ध करून दाखवला आहे. देशात शक्ती दुबेने यूपीएससीमध्ये अव्वल स्थान पटकावले, तर आदिबाने १४२ वा क्रमांक मिळवून एक नवीन टप्पा गाठला. आदिबाला तिच्या मेहनतीचे फळ मिळाले असले तरी ती आता कुटुंबाच्या अपेक्षाही पूर्ण करणार आहे..तिने बारावीनंतर यूपीएससी करण्याचे ठरवलेआदिबा अहमदचे सुरुवातीचे शिक्षण पुण्याच्या अबेदा इनामदार सिनियर कॉलेजमधून झाले. आदिबाने त्या कॉलेजमधून बी.ए पूर्ण केले. उर्दू आणि गणित या विषयात पदवी घेतली. नंतर यूपीएससीची तयारी सुरू केली. तिच्या यशाचे श्रेय तिच्या कुटुंबाला देताना आदिबा म्हणाली, 'मी बारावीनंतर ठरवले होते की, मला यूपीएससी उत्तीर्ण करायचे आहे..मला माझ्या मामाकडून प्रेरणा मिळाली, जे एका एनजीओचे सचिव आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मला या दिशेने पुढे जाण्याचे धाडस मिळाले." आदिबाचे वडील रिक्षाचालक आहेत आणि तिची आई गृहिणी आहे. त्या दोघांनीही आदिबाची जिद्द आणि चिकाटी बघून तिला पाठिंबा दिला..आदिबाला मिळाले तिसर्या प्रयत्नात यशपहिल्याच प्रयत्नात यूपीएससीच्या अंतिम यादीत आदिबाचे नाव आले नाही. म्हणून तिने प्रयत्न करायचे सोडून दिले नाही. तिने पुन्हा प्रयत्न केले. मात्र यावेळी आदिबाच्या कष्टाची चीज झाली आणि तिला यश मिळाले. ती म्हणते, "या प्रवासात मला अनेक वेळा असं वाटल की आता हे शक्य नाही, पण मला माझ्या कुटुंबाकडून मिळालेला पाठिंबा आणि कठोर परिश्रमामुळे मी कधीही मागे पडले नाही.'.आदिबाच्या कुटुंबाने, मित्रांनी आणि नातेवाईकांनी तिच्या यशाबद्दल अभिनंदन केले. तसेच तिला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. राज्यात आदिबाच्या यशाबद्दल तिच्या वडिलांनी सांगितले की, 'माझ्या मुलीने सिद्ध करून दाखवले आहे की, जर आत्मविश्वास असेल तर कोणतेही ध्येय साध्य करता येते. माझ्या मुलीने जो इतिहास रचला आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो.' असे आदिबाचे वडील म्हणाले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.