
राज्यात उष्माघाताच्या पाचशेवर रुग्णांची नोंद
मुंबई - राज्यात यंदा उन्हाळा चांगलाच तापला आहे. तापमानाचा पाराही वाढत असल्याने उष्माघाताच्या रुग्णांसह त्यामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये वाढ झाली आहे. आतापर्यंत राज्यात उष्माघाताच्या एकूण ५४३ रुग्णांची नोंद झाली असून २९ संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात १ मार्च २०२२ पासून आतापर्यंत विविध जिल्ह्यांमध्ये उष्माघाताने २९ संशयित मृत्यूची नोंद झाली आहे. ही संख्या गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक आहे. गेल्या दोन महिन्यांत ५४३ उष्माघाताचे रुग्ण नोंदले गेले आहेत. त्यापैकी सर्वाधिक ४१९ रुग्णांची नागपुरात नोंद झाली. त्यापाठोपाठ चंद्रपूर १६८, अकोला ४४, पुणे २७, नाशिक १७, औरंगाबाद १५, सोलापूर २५, लातूर आणि कोल्हापूर प्रत्येकी एका उष्माघाताच्या रुग्णाची नोंद झाली.
सर्वाधिक मृत्यू नागपुरात
महाराष्ट्रातील एकूण २९ मृत्यूंपैकी सर्वाधिक १२ मृत्यू नागपुरात, त्यानंतर औरंगाबाद पाच, नाशिक चार, अकोला येथे तीन मृत्यू झाले.
Web Title: Five Hundred Heat Stroke Patients Registered In State
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..