ग्राम रोजगार सेवकांना आता फिक्स मानधन | Honorarium | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Money
ग्राम रोजगार सेवकांना आता फिक्स मानधन

ग्राम रोजगार सेवकांना आता फिक्स मानधन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्यातील ग्राम रोजगार सेवकांना आता आशा स्वयंसेविकेच्या धर्तीवर दरमहा निश्‍चित मानधन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे आता ग्राम रोजगार सेवकांना त्यांनी रोजगार हमी योजनेत बेरोजगारांना उपलब्ध करून दिलेल्या कामांच्या मनुष्यदिनाच्या प्रमाणानुसार दरमहा किमान दोन हजार रुपये तर, सहा हजार ४०० रुपयांचे मानधन मिळू शकणार आहे. यानुसार महिन्याला किमान ७५१ मनुष्यदिनाची रोजगार निर्मिती करणाऱ्यांना दोन हजार रुपये आणि दहा हजार मनुष्यदिन रोजगार निर्मिती करणाऱ्यांना सहा हजार ४०० रुपयांचे मानधन मिळणार आहे.

यानुसार प्रति ग्राम रोजगार सेवकांना दर वर्षाला प्रत्येकी किमान २४ हजार रुपये तर, ७६ हजार ८०० रुपयांचे मानधन मिळणार आहे. गावेच गावांच्या विकासाचे शिल्पकार व्हावेत, या उद्देशाने केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीतील तरतुदीनुसार गावनिहाय ग्राम रोजगार सेवकांची नियुक्ती करण्याची तरतूद केली आहे. यामुळे गावागावात रोजगार हमीची कामे वाढू शकतील, गावातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळेल. पर्यायाने गावातील विकासकामे ही मार्गी लागून, गावांचा विकास होण्यास मदत होईल, अशी यामागची केंद्र सरकारची भावना आहे.

हेही वाचा: एसटी संपाचा टीईटी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना बसला फटका

मानधनाची सध्याची पद्धती (मनुष्यदिन)

 • एक हजार मनुष्यदिनसाठी - मजुरांना वाटप केल्या जाणाऱ्या एकूण मजुरीच्या सहा टक्के

 • एक हजारांपासून पुढे व दोन हजार मनुष्यदिनाच्या आत - चार टक्के

 • दोन हजारांहून अधिक मनुष्यदिन - २.२५ टक्के

मनुष्यदिन म्हणजे काय?

गावातील बेरोजगारांना किंवा मजुरांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या दिवसांना मनुष्यदिन म्हटले जाते. यानुसार दिवसाच्या मोबदल्यासाठी निश्‍चित केलेल्या कालावधीला एक मनुष्यदिन म्हटले जाते. उदाहरणार्थ एका दिवशी दहा मजुरांना रोजगार हमीचे काम उपलब्ध करून दिले तर, ते त्या दिवसाचे दहा मनुष्यदिन झाले, असे म्हटले जाते.

नव्याने मिळणारे मनुष्यदिननिहाय दरमहा मानधन

 • ० ते ७५० मनुष्यदिन - प्रचलित पद्धतीनुसार एकूण कामाच्या सहा टक्के

 • ७५१ ते १५०० मनुष्यदिन - दोन हजार रुपये

 • १५०१ ते २५०० मनुष्यदिन - तीन हजार रुपये

 • २५०१ ते ४००० मनुष्यदिन - तीन हजार ५०० रुपये

 • ४००१ ते ५५०० मनुष्यदिन - चार हजार रुपये

 • ५५०१ ते सात हजार मनुष्यदिन - चार हजार ५०० रुपये

 • सात हजार एक ते आठ हजार मनुष्यदिन - पाच हजार रुपये

 • आठ हजार एक ते नऊ हजार मनुष्यदिन - पाच हजार ७०० रुपये

 • नऊ हजार एक ते दहा हजार मनुष्यदिन - सहा हजार ४०० रुपये

loading image
go to top