"राज्यातील छोट्या विमानतळांवरून उड्डाणे महिनाभरात सुरू होणार"

महाराष्ट्र चेंबरला सरकारचे आश्वासन
Lalit Gandhi
Lalit Gandhisakal news

मुंबई : अमरावती विमानतळावरून (Amravati Airport) यावर्षी नोव्हेंबर महिन्यात उड्डाणे सुरू (flights starts from November) होतील तर पुणे-शिर्डी-नागपूर विमानसेवा या महिन्यात तसेच पुणे-औरंगाबाद-नागपूर विमानसेवा एक मार्चपासून सुरु होईल, अशी घोषणा महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष दिपक कपूर (deepak kapoor) यांनी सोमवारी येथे केली.

Lalit Gandhi
ठाणे : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नामकरणाचा आग्रह

या विमानतळांचा विकास आणि समस्या या विषयावर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या पुढाकाराने आयोजित बैठकीत कपूर यांनी ही ग्वाही दिली. या बैठकीत यासंदर्भात अनेक सूचना झाल्या. प्रामुख्याने कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या विभागातील शेतमालाला बाजारपेठ मिळण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय माल वाहतूक विमानसेवा सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. कोल्हापूर विमानतळाचे विस्तारीकरण जलदगतीने पूर्ण करण्याची मागणीही गांधी यांनी केली.

रोजगारासाठी प्रशिक्षण

औरंगाबाद विमानतळावरून नवीन मार्ग सुरू करणे, जळगाव विमानतळावरून मालवाहतूक सुरु करणे, नाशिक विमानतळावरील सुविधा वाढवणे यासंदर्भात गांधी यांनी बैठकीत सूचना केल्या. जिल्हास्तरावर विमानतळ विकास प्राधिकरण व महाराष्ट्र चेंबरतर्फे प्रशिक्षण केंद्र उभारून स्थानिक युवकांना विमानसेवेशी निगडित रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील असेही ते म्हणाले.

Lalit Gandhi
मिरा-भाईंदर, वसई-विरारमधील तीन डॉक्टरांवर गुन्हे

सरकारने दिलेली आश्वासने

शिर्डी येथे स्वतंत्र कार्गो टर्मिनल.

अमरावती विमानतळासाठी राज्याकडून २३ कोटी.

तेथून नोव्हेंबर २०२२ पासून प्रवासी विमानसेवा सुरु.

पुणे शिर्डी नागपूर विमानसेवा १८ फेब्रुवारी पासून अलायन्स एअरतर्फे.

पुणे औरंगाबाद नागपूर सेवा 1 मार्चपासून.

तीन महिन्यांत कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारासाठी ६४ एकर जमिनीचे संपादन.

रत्नागिरी विमानतळाचा विकास सुरु होणार.

राज्यातील जिल्हे व महानगरांना जोडण्यासाठी नवीन हवाईमार्ग सुरू करण्याची सूचना वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी यांनी केली. चेंबरच्या नागरी विमानोड्डाण समितीचे सुनीत कोठारी यांनी, विमानसेवा पुरवणाऱ्या कंपनांच्या इंधनाचा मूल्यवर्धित करात कपात करून तो एक टक्का करावा असे सुचविले. शिष्टमंडळात वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, उपाध्यक्ष करूणाकर शेट्टी, उपाध्यक्ष सौ शुभांगी तिरोडकर, उपाध्यक्ष रवींद्र माणगवे, उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, उपाध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर, सुनीत कोठारी, प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com