पूरग्रस्त भागातील वीज पूर्ववत; ऊर्जामंत्र्यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 August 2019

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील, तसेच कोकणातील महापुरामुळे खंडित झालेली वीज पूर्ववत करण्यासाठी महावितरणने नियोजनबद्ध अंमलबजावणी केली. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील २४ व सांगली जिल्ह्यातील १० अशी ३४ उपकेंद्रे सुरू करण्यात आली आहेत, तर उर्वरित भागातील वीजपुरवठा १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण केला जाईल, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

मुंबई - सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील, तसेच कोकणातील महापुरामुळे खंडित झालेली वीज पूर्ववत करण्यासाठी महावितरणने नियोजनबद्ध अंमलबजावणी केली. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील २४ व सांगली जिल्ह्यातील १० अशी ३४ उपकेंद्रे सुरू करण्यात आली आहेत, तर उर्वरित भागातील वीजपुरवठा १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण केला जाईल, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

कोल्हापुरातील २८८४ व सांगलीतील ९२३ अशा एकूण ३८०७ रोहित्रांचा व २ लाख ७३ हजार ८१७ वीजग्राहकांचा वीजपुरवठा आतापर्यंत सुरू केला आहे.

स्वातंत्र्यदिनापर्यंत शेतीपंप वगळता पूर ओसरलेल्या भागातील वीजपुरवठा सुरू करण्याचा प्रयत्न असून, त्यासाठी कोल्हापूर-सांगलीतील ४ हजार महावितरणचे, दीड हजार कंत्राटी व शेजारच्या जिल्ह्यातून आलेल्या ४० पथकातील ५०० हून अधिक कर्मचाऱ्यांची टीम अहोरात्र झटत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचीही काळजी घेण्यात आली असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. 

कोल्हापूर व सांगली या दोन्ही जिल्हयामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे या भागातील र्व नद्या धोक्‍याच्या पातळीपेक्षा जास्त वाहू लागल्याने नदीकाठच्या परिसरातील पाणीपुरवठा योजना व शेतीपंप, वीज वितरण यंत्रणा व ग्राहकांच्या उपकरणांचे नुकसान होऊ नये, यासाठी वीजपुरवठा बंद करण्यात आला.

कोल्हापूर व सांगली जिल्हयातील ४२ उपकेंद्रे, वितरण रोहित्र  ६,१७७, वाहिन्या १३२ तसेच ३ लाख ९० हजार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आला. हजारो रोहित्र व शेकडो वाहिन्या पूरात जाऊनही जेथे शक्‍य आहे त्या भागाला पर्यायी मार्गाने वीज देण्याचे काम कर्मचाऱ्यांनी केले .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood Affected Area Electricity Continue Chandrashekhar Bavankule