१३ बळी घेणारा नरभक्षी वाघ जाळ्यात; तीन जिल्ह्यांमध्ये घातला होता धुमाकूळ

bhandara tiger captured
bhandara tiger capturedesakal

भंडाराः एक-दोन नव्हे तर तब्बल १३ जणांचा बळी घेणाऱ्या नरभक्षी वाघाला जाळ्यात अडकवण्यात वनविभागाला यश आले आहे. मागील तीन महिन्यांपासून या वाघाला पकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरु होते.

'सीटी १' या नरभक्षी वाघाने भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांमध्ये धुमाकूळ घातला होता. ताडोबा अभयारण्यातील विशेष पथक या वाघाला पकडण्यासाठी प्रयत्न करत होतं. परंतु तीन महिन्यांपासून हा वाघ हुलकावणी देत होता. गुरुवारी सकाळी या वाघाला पकडण्यात यश आलेलं आहे.

'सीटी १' या वाघाने आतापर्यंत १३ लोकांची शिकार केली आहे. त्यामुळे परिसरातील नागरीक दहशतीखाली वावरत होते. दोन दिवसांपूर्वी देसाईगंज जवळच्या एका गाईवर या वाघाने हल्ला केला. त्यामुळे तेथेच वनविभागाची टीम पाळत ठेवून होती.

bhandara tiger captured
Rutuja Latke News : आम्ही कुणावरही दबाव आणलेला नाही; शंभूराज देसाई नेमकं काय बोलले?

गुरुवारी सकाळी ताडोबा येथील टीमने या वाघाला सापळ्यात अडकवला. त्याच्यावर बेशुद्धीचं इंजेक्शन डागण्यात आलं. १३ जणांचा बळी घेतल्यानंतर हा वाघ पकडण्यात आलाय. परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. या वाघाला गडचिरोली जिल्ह्यातल्या वडसा येथे जेरबंद करण्यात आलेलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com