Rutuja Latke News : आम्ही कुणावरही दबाव आणलेला नाही; शंभूराज देसाई नेमकं काय बोलले?

Rutuja Latke
Rutuja LatkeSakal
Updated on

मुंबईः ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा पालिका प्रशासनाने स्वीकारला नसल्याने आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. गुरुवारी मंत्री शंभूराज देसाई यांनी भाजप आणि शिंदे गटावर होत असलेले आरोप फेटाळून लावले.

'निवडणुकीची दिशा बदलण्याचं काम काही लोक करत आहेत. आम्ही कुणावरही दबाव आणलेला नाही. त्यांच्या बाजूने निर्णय आला की सगळ्या यंत्रणा योग्य आणि विरोधात निर्णय गेला की यंत्रणा आणि आमच्यावर आरोप; हे चुकीचं आहे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. घटनेने दिलेल्या अधिकारात आयोग काम करतो, अशा भावना शंभूराज देसाई यांनी यांनी व्यक्त केल्या.

शासकीय नोकरीचा राजीनामा दिल्याशिवाय कोणतीही निडणूक लढवता येत नाही. याच कारणामुळे ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. असे असताना आता ऋतुजा लटके यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी पालिका प्रशासनाला राजीनामा मंजूर करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

Rutuja Latke
Shivsena: ऋतुजा लटकेंना राजीनामा मिळालाच नाही तर..? काय असणार शिवसेनेचा ‘प्लान बी’

दरम्यान, लटके कुटुंबीयांनी रात्री उशीरा उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. मात्र, दोघांमध्ये काय चर्चा झाली हे अद्याप कळलेलं नाही. दोघांचातील चर्चा गुलदस्त्यात आहे. तर दुसरीकडे अनिल परब यांच्या उपस्थित विलेपार्ल्यात बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये प्रमोद सावंत आणि कमलेश राय हेदेखील उपस्थित होते. अनिल परब यांनी घेतलेल्या बैठकीमुळे चर्चेला उधाण आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur city
The Pune Municipal Corporation has approved medical assistance for the families of former corporators under its contributory healthcare scheme.
Students Get Financial Boost as Monthly Hostel Meal Grant Raised to ₹3,200
solapur city police comissioner m raj kumar
Marathi News Esakal
www.esakal.com